ना.नितीन गडकरी, ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टरेट पदवी मिळणार
परभणी (Parbhani Agricultural University) : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २६ वा दिक्षांत समारंभ गुरूवार २३ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दिक्षांत सभागृहात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे कुलगुरू डॉ.इन्द्र मणि यांनी दिली आहे.
या (Parbhani Agricultural University) दिक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी.राधाकृष्णन हे भुषविणार आहेत. राज्याचे कृषीमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. माणिकराव कोकाटे हे दिक्षांत समारंभास सन्मानीत अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तर दिक्षांत समारंभास खडगपूर येथील भारतातील पहिल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे नामांकीत कृषि अभियंता तथा माजी संचालक प्रा.विरेंद्र कुमार तिवारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून दिक्षांत अभिभाषण करणार आहेत.
विशेष म्हणजे या (Parbhani Agricultural University) दिक्षांत समारंभात केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी आणि राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. या बरोबरच सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विविध विद्या शाखेतील पदवी, पदव्यूत्तर पदवी व आचार्य पदवी पूर्ण करणार्या एकूण ३ हजार ४६२ विद्यार्थ्यांना यावेळी पदवी देण्यात येणार आहे.
दिक्षांत समारंभात विद्यापीठातील (Parbhani Agricultural University) विविध अभ्यास क्रमांसाठी विद्यापीठाने व दात्यांनी निश्चित केलेल्या सुवर्णपदके, रौप्य पदके व रोख पारितोषिके पात्र पदवीधरांना प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यात आचार्य पदवीचे २९ पात्र स्नातक, पदव्युत्तर पदवीचे ३०७ स्नातक व पदवी अभ्यासक्रमाचे ३ हजार १२६ स्नातकांचा समावेश आहे.
दिक्षांत समारंभात एकूण ६० पदके आणि प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये १४ विद्यापीठ सुवर्णपदके, दात्यांकडून देण्यात येणारे १० सुवर्णपदके, १ रौप्य पदक आणि ११ रोप पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असून २४ पदव्युत्तर पदवी गुणवत्ता प्रमाणपत्रांचा समावेश आहे. दिक्षांत समारंभास उपस्थित असलेल्या स्नातकांना समारंभानंतर पदवी प्रमाणपत्रे देण्यात येतील व उर्वरित स्नातकांना त्या दिवशी त्यांच्या संबंधित महाविद्यालयात प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती कुलगुरू डॉ.इन्द्र मणि यांनी दिली.
इतरांना युटयूबवर पाहता येणार सोहळा
पदवी अनुग्रहित करण्यात येणार्या स्नातकांची यादी विद्यापीठाच्या संकेत स्थळावर देण्यात आली आहे. ज्यांची नावे या यादीत असतील त्यांनाच दिक्षांत दिंडीत सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल. (Parbhani Agricultural University) दिक्षांत समारंभाच्या यादीत नाव असणार्या स्नातकांनीच कार्यक्रमास उपस्थित राहावे, या व्यतिरिक्त ईतर विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवरांना दिक्षांत समारंभ विद्यापीठाच्या युटयूब चॅनलवर पाहण्याची सोय करण्यात आली आहे.