सिंचन व वीज अनुशेषबाबत झाली चर्चा
हिंगोली (Tanaji Mutkule) : जिल्ह्याचा सिंचन व विज अनुशेष प्रश्नाबाबत आमदार तान्हाजीराव मुटकुळे (Tanaji Mutkule) यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (Governor Radhakrishnan) यांची सदिच्छा भेट घेतली. हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष २०१७ साली परभणी जिल्ह्यातून वेगळा करून मान्य करण्यात आला होता, त्या अनुषंगाने बर्याच प्रमाणात सिंचनाची कामे झाली. परंतु बरीच कामे कर्मचार्यांचा अभावामुळे बंद पडत आहेत.
मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी केली. त्यावेळी सोबतच सिंचन विहरी २२००० करण्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण कार्यालय पुणे यांनी अभिप्राय दिला होता; परंतु प्रत्यक्षात फक्त ५००० विहिरी पूर्ण झाल्या आहेत. त्याच बरोबर सिंचन वाढल्यामुळे विजेचाही तुटवडा भासत आहे. या विजेची अनेक केंद्रे मंजूर करून द्यावी अशी मागणी यावेळी केली. यावेळी सोबत शहराध्यक्ष कैलास काबरा,नगरसेवक राजू गोटे व हमीद प्यारेवाले उपस्थित होते.