देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (GPS-GSM Tagging) : सारस पक्ष्यांच्या एकंदर वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्यावतीने गोंदिया येथील पक्ष्याच्या पायाला टॅगिंग करण्यात आले आहे. सारसच्या पायाला रिंग लावण्याचा आणि जीपीएस- जीएसएम टॅगिंग (GPS-GSM Tagging) करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. विदर्भातील सारस पक्षी (Stork birds) हे मोठ्या प्रदेशात विखुरलेले आहेत आणि ते स्थानिक स्थितीनुसार आपली घरटी बदलवत असतात. गोंदिया जिल्ह्यात या सारस पक्ष्यांचा अधिवास आहे.
बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांनी नोव्हेंबर महिन्यात तीन दिवसया पक्ष्यांचा अभ्यास केला आणि त्यांचा सातत्या माग काढीत राहिले. त्यानंतर, मागील आठवड्यात पहिल्या पक्षाला टॅगिंग (GPS-GSM Tagging) करण्यात या शास्त्रज्ञांना यश आले आहे. बीएनएचएसचे उपसंचालक डॉ. पी. साथियासेल्वम यांनी अभ्यास मोहिमेचे नेतृत्व केले. बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे आणि महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीवरक्षक विवेक खांडेकर यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला होता.
‘सारस पक्ष्यांना पकडण्यासाठी आधी त्यांच्या अधिवासाच्या जागा शोधण्यात आल्या. (Stork birds) पक्ष्यांचा विणीचा हंगाम संपला असल्याने काही ठराविक ठिकाणे निश्चित करण्यात आली. टॅगिंगचे काम झाल्यानंतर या पक्ष्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले. एका पूर्ण वाढीच्या पक्ष्यासोबतच दोन इतर ‘सब- अडल्ट’ पक्ष्यांनाही रिंग लावण्यात आल्या आहेत’, असे डॉ. पी. साथियासेल्वम यांनी सांगितले.
बीएनएचएसचे जीवशास्त्रज्ञ बरथ, प्रकल्प समन्वयक मुकुंद धुर्वे, पक्षी पकडण्यातील तज्ज्ञ शिवकुमार, कन्नदासन, सरसकुमार बेहेरा आणि सहायक रामेश्वरे यांनी यांनी या मोहिमेत काम केले. याशिवाय, गोंदियाचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक, राउंड ऑफिसर संतोष श्रीवास्तव, वनरक्षक विठ्ठल चौहान, राधेश्याम रहांगडाले, कृष्णा भलावी, सोमेश्वर कोल्हे यांनी या कामाकरिता बीएनएचएसच्या चमूला सहकार्य केले.
संशोधनाकरिता विदर्भातील पहिला प्रयोग
हायकोर्टाच्या आदेशानुसार राबवण्यात आला उपक्रम
‘मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील (Stork birds) सारस पक्ष्यांचे सर्वेक्षण बीएनएचएसच्या माध्यमातून करून घ्यावे तसेच त्यांचे अधिवास तसेच संचार याबाबत अधिक माहिती घ्यावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. (GPS-GSM Tagging) टॅगिंग केलेल्या पक्ष्याकडून माहिती येण्यास प्रारंभ झाला आहे’, असे बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांनी म्हटले आहे.