रोजगार हमी, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही
मानोरा (Rojgar yojana) : तालुक्यातील सर्वत्र मनरेगा रोजगार हमीची कामे चक्क जेसीबीने सुरू असुन बोगस मजुरांच्या नावाचे मस्टर तयार शासनाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या संबंधितावर कार्यवाही झाल्याशिवाय (Rojgar yojana) मनरेगाचा भ्रष्टाचार थांबणार नसल्याचे दिसत आहे.
ग्रामीण स्तरावर मजुरांच्या हाताला काम मिळावे. यासाठी मनरेगा (Rojgar yojana) अंतर्गत कोटी रुपये शासन उपलब्ध करून देते. परंतु मजुरांचे खोटे मस्टर तयार करून शाखा अभियंता यांना हाताशी धरून काही अधिकारी व कर्मचारी आपली पोळी भाजून घेत आहेत. तालुक्यात सिंचन विहीरीचे कामे चक्क जेसीबीने करून चक्क डल्ला मारत आहेत. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष केंद्रीत करून जॉब कार्डधारक यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी संबंधितावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
शासन परिपत्रकानुसार (Rojgar yojana) रोजगार हमीची कामे मजुराच्या हाताला मिळावे, यासाठी ही योजना शासन राबवित आहे. मात्र बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावाने मस्टर काढत चक्क जेसीबी यंत्राच्या साहाय्याने कामे तालुक्यात सुरू आहेत.