जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले
हिंगोली (Gram Panchayat Election) : राज्यातील सर्व ग्रामपंचायत पोट निवडणुक २०२५ मध्ये ओबीसींचे आरक्षण कायम ठेवून २४ मार्च रोजीच्या ग्रामसभा रद्द करून निवडणुका घेण्याच्या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
२२ मार्च रोजी (Gram Panchayat Election) ओबीसी जनमोर्चा जिल्हाध्यक्ष अॅड. रवी शिंदे, समता परिषद कार्याध्यक्ष चंदू लव्हाळे, समता परिषद जिल्हाध्यक्ष डॉ. नागोराव जांबुतकर, कृउबास सभापती मारोतराव खांडेकर, अशोकराव करे, सावता परिषद जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गाभणे, जिवा सेना प्रदेश उपाध्यक्ष उमेश गोरे, साहेबराव मस्के, पंजाबराव गडदे. सुदर्शन वायकोळे, अनिल मस्के, राजु वाबळे, तुकाराम वाबळे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन नायब तहसीलदार चंद्रकांत गोळेगावकर यांनी स्विकारले निवेदनात १७ मार्च रोजी ओबीसींचे ग्रा.पं. निवडणुकीतील २७ टक्के आरक्षण संपविण्यासाठी काढलेला आदेश आणि २४ मार्च रोजी आयोजित ग्रामसभा सुध्दा रद्द कराव्यात. ओबीसींचे पाच वर्षासाठी जाहीर केलेले (Gram Panchayat Election) ग्रा. पं. वार्डचे आरक्षण कायम ठेवावे. अन्यथा जिल्ह्यात ओबीसी जनमोर्चा, समता, सावता परिषद, जिवा सेना व ओबीसी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.




