माजी सरपंच पती घोडे आनला प्रकार उघडकीस
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Gram Panchayat) : तालुका आरोग्य अधिकारी चिखली यांनी तालुक्यांतील दिड वर्षापूर्वी ९ ग्रा. प. ग्रामसेवकांना ग्रामसभेतून आशा सेविकेची निवड करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते . परंतु ९ ग्रा.प. ग्रामसेवकांपैकी ३ ग्रां. प. च्या ग्रामसेवकांनी (Gram Panchayat) अधिकाऱ्यांचा आदेश धुडकवित आजपर्यत आशा सेविकेचा निवड केली नाही . हा प्रकार मेरा खुर्द येथील माजी सरपंच पती नंदकिशोर घोडे यांनी उघडकीस आनला.
चिखली तालुका आरोग्य अधिकारी यांनी तालुक्यातील मेरा खुर्द , कोलारा ब्रम्हपुरी, वळती, सैलानी नगर, उदयनगर बेराळा, हिवरा नाईक, शेलुद या ९ गावामध्ये आशा सेविकांनी वाढीव पदे भरण्यासाठी ग्रामसेवक यांना दिनांक १६ मे २०२३ रोजी आदेश काढले होते की , गावामध्ये नव्याने मंजुर झालेल्या आशा स्वयंसेविकांचे पद मार्गदर्शक सुचनांचे अवलोकन भरुन त्वरीत भरण्यात यावे. आपल्या गावातील आशा स्वयंसेविकेचे पद नव्याने मंजुर झाल्यामुळे त्या ठिकाणी नविन आशाची नियुक्ती करणे अत्यावश्यक असल्याने आपल्या गावातील होणा-या ग्रामसभेमध्ये नविन आशा निवडीबाबत ठराव घेवून तसा अहवाल या कार्यालयास पाठवून आपल्या तालुक्याचे आशास्वयंसेविकेचे उद्यिष्टि पूर्ण होण्याकरिता सहकार्य करावे. वरील प्रमाणे कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. (Gram Panchayat) ग्रामसभेत आशा सेविकेचा निवड करतांना ज्या एखाद्या महिलेने किमान तीन वर्षे आरोग्य क्षेत्रात काम केलेले असेल तर अशा महिलांसाठी शैक्षणिक पावता इ. ८ वी पास पर्यंत अट शिथिल करण्यात यावी.
तसेच आशा सेविकेसाठी इतर महिलांसाठी किमान ८ वी पास नसावी ८, ९, १० वी पास असल्यास सुम्म गुण व पुढील प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या पात्रतेसाठी ९ गुण याप्रमाणे गुण देण्यात यावे ज्या. ११ भी पास असल्यास २ गुण, १२ वी पास असल्यास ४ गुण, या प्रमाणे गुण द्यावे , कामाचा अनुभव ५ गुण, विधवा परितक्त्या २ गुण -संभाषण व प्रोत्साहन कौशल्य-२ गुण असे एकूण १५ गुण असणे आवश्यक आहे .असे आदेश काढून तात्काळ ग्रामसभा घेवून आशा सेविकेचा निवड करण्यात येवून तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले होते . त्यामध्ये ब्रम्हपुरी, वळती, सैलानी नगर, हिवरा नाईक, शेलुद , या गावातील (Gram Panchayat) ग्रामसेवकांनी आदेशाचे पालन करून आशावसेविकेची निवड केली मात्र मेरा खुर्द, कोलारा, आणि उदयनगर या गावातील ग्रामसेवकांनी अधिकाऱ्यांचा आदेश गेल्या दिड वर्षा पासून धुडकावत आजपर्यत आशा सेविकेची निवड केली नाही त्यामध्ये मेरा खुर्द चे ग्रामसेवक इंगळे यांनी तर जवळची नातेवाईक महिला घेणयासाठी जाणून बुजून निवड थांबविली आहे, असे माजी सरपंच नंदकिशोर घोडे यांनी म्हंटले आहे.