मालेवाडा/भिवापूर (Bhivapur) :- भाजपाचे (BJP) नागपूर जिल्ह्याचेअनुसूचित जाती विभागाचे महामंत्री तथा मानोरा ग्रामपंचायतचे सदस्य मिथुन माटे यांनी एक ऑगस्ट पासून भिवापूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
भिवापूर तालुक्यातील ग्रामपंचायत मानोरा अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामावर बोगसमजूर दाखवू शासकीय निधीचा(Government funds) अफार करणे, खैरगाव येथील मशान घाट मध्ये झालेल्या सिमेंट रस्त्याची चौकशी करणे, जन सुविधा अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे आदी मागण्या घेऊन अनेकदा प्रशासनाला चौकशी करिता लेखी तक्रारी दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याची प्रयत्न केले. त्यामुळे अखेर नाही ला जास्त एक ऑगस्ट पासून भिवापूर पंचायत समितीच्या समोर आमरण उपोषण (Fasting to death)सुरू करण्याचा निर्णय मिथुन माटे यांनी घेतला.