देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Gram Panchayat Officer) : तालुक्यातील ग्रा. प. कार्यालयात जण माहिती अधिकार फलक लावणे बंधनकारक होते परंतु अनेक ग्रा. प. च्या प्रसिद्धी बोर्डावर फलक दिसून आले नव्हते त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी 9 नोव्हेबर रोजी परिपत्रक काढून सर्व ग्रामसेवकांना ग्रा. प. कार्याल्यात प्रसिद्धी बोर्डावर त्वरित माहिती अधिकार अधिनियम-२००५ अन्वये फलक लावण्यात यावे असे आदेश देण्यात आले. आणि या आदेशाची बातमी दैनिक देशोन्नती मध्ये 15 नोव्हेबर रोजी प्रकाशीत करण्यात आली होती. बातमी प्रकाशित होताच लगेच ग्रामसेवक यांनी ग्रा. प. च्या प्रसिद्ध बोर्डावर जन माहिती अधिकारी फलक लावले.
गटविकास अधिकारी चिखली (Gram Panchayat Officer) यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले होते की ग्रामीण भागातील लोकांना ग्रा. प. च्या माध्यमातून गावात झालेली विकास कामे, त्याचा खर्च आणि काम केले किंवा नाही, केले असेल तर चांगले व दर्जेदार स्वरूपाचे असणे बंधनकारक आहे . परंतु अनेक ग्रा. प. मध्ये चांगली कामे केली जातं नाही आणि निकृष्ट दर्जाची कामे करुण ठेकेदार व सरपंच, सचिव हे घेवान देवान करुण मोकळे होतात.त्यामुळे झालेल्या कामाची माहिती जनतेला मिळणे बंधनकारक आहे.
मात्र केलेल्या कामाचा उलगडा (Gram Panchayat Officer) ग्रामसभेत होत नाही नसल्याची तक्रार राजु लहाने यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती या तक्रार अर्जा वरून सर्व ग्रा. प. च्या प्रसिद्ध बोर्डावर माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४ अशा पद्धतीचे फलक प्रसिद्धी बोर्डावर नागरीकांना दिसेल अश्या ठिकाणी प्रसिद्ध करावी, माहिती अधिकार अंतर्गत ग्रामपंचायत व्दारे सामान्य नागरीकांना देण्यात येणा-या माहिती अधिकार अंतर्गत माहिती बाबत जन माहिती अधिकारी यांचे नाव पदनाम ईत्यादी सदर माहिती फलकावर नमुद करावी.
माहिती अधिकार २००५ अंतर्गत यापुर्वीच या कार्यालयाकडुन संदर्भिय विषयान्वये सुचना वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. तथापी ज्या जन माहिती अधिकारी यांनी अद्यापही या सुचनेचे अंमलबजावणी केली नाही त्यामुळे त्यांनी सदर हे पत्र मिळतांच तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा या संदर्भाने या कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाल्यास सर्वस्वी वैयक्तिक जबाबदारी ही त्या त्या जनमाहिती अधिकारी तथा सचिव (Gram Panchayat Officer) ग्रामपंचायत यांच्यावर राहील असे आदेशाचे पत्रक सर्व ग्रामसेवकांना काढले होते त्यामुळे या आदेशा वरून दैनिक देशोन्नती मध्ये 15 नोव्हेंबर रोजी बातमी प्रकाशीत करण्यात आली होती बातमी प्रकाशीत होताच सर्वत्र खळबळ उडाली आणि लगेच अंत्री खेडेकर ग्रा. प. च्या प्रसिद्धी बोर्डावर जण माहिती अधिकाराचे फलक लावण्यात आले असून लवकरच तालुक्यातील सर्व ग्रा. प. च्या प्रसिद्धी बोर्डावर जण माहिती अधिकाराचे फलक पाहायला मिळणार हे मात्र खरे!.