मानोरा (Gram Panchayat) : विठोली ग्राम पंचायत (Gram Panchayat) अंतर्गत येणाऱ्या बेलोरा या गावाला (Belora village) पावसाळ्यात मागील कित्येक वर्षांपासून पुराचा फटका बसत आहे. मागील वर्षी २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य रोजी खोराडी नदीला महापूर आल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे पूर संरक्षण भिंत बांधकाम करण्याच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे अधिकारी यांची वारंवार भेट घेऊन ग्रामस्थांनी आपबिती मांडली. वेळोवेळी आंदोलन केले. मात्र समस्या सुटत नसल्याने आता १२ जून रोजी तहसिल कार्यालय समोर आत्मदहन करण्याचा इशाऱ्याचे निवेदन तहसिलदार डॉ संतोष येवलीकर यांना दि. २० एप्रिल रोजी विशाल विष्णू ठाकरे यांनी दिला आहे.
आश्वासनाशिवाय पदरात काहीच नाही
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आम्ही (Belora village) बेलोरावासी ग्रामस्थ खोराडी नदी पात्राच्या काठावर वास्तव्यास आहे. मागील वर्षी २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे नदीला संरक्षण भिंत नसल्याने महापुराचे पाणी गावात घुसल्याने गावातील नागरिकांच्या घराचे अतोनात नुकसान होवून घरातील वस्तू सुध्दा पुरात वाहून गेले. भयानक पुराच्या तावडीतून त्यावेळी नागरिकांचे जीव थोडक्यात वाचले. मागील वर्षापासुन पूर संरक्षण भिंत बांधकाम करण्यात यावे. (Gram Panchayat) याबाबत विविध प्रकारचे आंदोलन ग्रामस्थांनी केले. पण आश्वासनाशिवाय पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसात पूर संरक्षण भिंतीचे बांधकाम कामाला सुरूवात न केल्यास आत्मदहन करणार असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
संपुर्ण गाव वाहून जाण्याची शक्यता
पावसाळा तोंडावर आला आहे. आधीच (weather) हवामान खात्याने यंदा पावसाचा चांगला अंदाज वर्तविला आहे. गावाला लागूनच वाहत असलेल्या खोराडी नदी जवळील माती वाहून गेली आहे. त्यामुळे पूर आल्यास संपुर्ण गाव वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूर संरक्षण भिंतीचे काम पावसाळा अगोदर करणे गरजेचे आहे.