वलनी ग्राम पंचायत येथील प्रकार
खापरखेडा (Gram Panchayat Valani) : सतरा सदस्य असलेले ग्राम पंचायत वलनी येथील लोकनियुक्त आलेले सरपंच अरविंद गजभिये यांच्यावर गुरुवारी अविश्वास प्रस्ताव पारित झाला. निर्णय अधिकारी सावनरचे नायब तहसीलदार कैलास अल्लेवार यांनी 13 सदस्यांनी अविश्वास पारित होण्यासाठी मतदान केले तर एक मतदान सरपंच यांच्या बाजूने असल्याचा निर्णय जाहीर केला.
डिसेंबर 2022 मध्ये लोक निवडणूक अरविंद गजभिये राहणार वलनी हे (Gram Panchayat Valani) ग्राम पंचायत वलनीची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या सोबत दोन ग्राम पंचायत सदस्य अपक्ष उमेदवार संगीता परतेकी आणि देशभ्रतार हे निवडून आले होते. काँग्रेस समर्थित 11 उमेदवार आणि 4 भाजप समर्थित उमेदवार निवडून आले होते. डिसेंबर महिन्यात दोन वर्ष पूर्ण होताच भाजप चे चार ग्राम सदस्य राजकुमार ठाकरे, कन्याकुमारी बोंदरे, बबिता बावणे, सिंदू चकोले यांनी काँग्रेसचे समर्थित ग्राम पंचायत उपसरपंच लईक अन्सारी, सदस्य देवा मुलमुले, अशोक बुरडे, शोएब अन्सारी, अनिता मारबते, स्वप्नील शेंडे, किरण गौतम, सुनीता सूर्यवंशी, कृष्णा कामडे यांच्याशी हात मिळवणी केली होती.
अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यापासून दाखल करणारे सर्व 15 ग्राम पंचायत सदस्य हे अज्ञात स्थळी होते. (Gram Panchayat Valani) गुरुवारी निवडणूक सुरू झाली तेव्हा सभागृहात उपसरपंच लईक अन्सारी हे तडीपार असल्याने आणि ग्राम पंचायत सदस्य सुनीता सूर्यवंशी या तीन अपत्य असल्याने त्यांचे पद रद्द करण्यात आल्याने मतदानापासून वंचित राहिले. अपक्ष निवडून आलेल्या अश्विनी देशभ्रतार या मतदानासाठी सभागृहात दिलेल्या वेळे नंतर पोहचल्या. त्यामुळे त्यांना मतदानासाठी सभागृहात जाता आले नाही. अपक्ष उमेदवार संगीता परतेकी अनुपस्थित राहिल्या. अत्यंत नाटकीय आणि चोख पोलीस बंदोबस्तात हे मतदान पार पडले.
आता ग्रामसभेत होणार मतदान
निवडून अधिकारी यांनी अविश्वास प्रस्ताव पार झाल्याचे निर्णय दिले. निवडणूक विभागाच्या नियमानुसार येत्या पंधरा दिवसात तहसीलदार यांच्या कडून आदेश प्राप्त झाल्यावर विशेष (Gram Panchayat Valani) ग्राम सभा बोलावून ग्राम सभेत उपस्थित वलणी येथील मतदारांकडून मतदान घेण्यात येणार आहे. सरपंचावर झालेल्या अविश्वासाच्या बाजूने मतदारांनी कल दिल्यास वलनी येथे सरपंच पदासाठी पुन्हा थेट जनतेतून निवडणूक घेण्यात येणार. ही निवडणूक येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी सोबत घेणार येणार असे काही जाणकारांनी मत व्यक्त केले.