नांदेड (Gramsevak Exam) : शहरापासून जवळच असलेल्या विष्णुपूरी येथील सहयोग कॅम्पसमधील परिक्षा केंद्रावर आज २९ जुलै रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान ग्रामसेवक पदाची परिक्षा (Gramsevak Exam) होती. परंतु परीक्षार्थी विद्यार्थिंनी मिनाबाई सुर्यवंशी यांच्या ओळखीच्या पुराव्यावर वडिलांचे व पतीचे दोघांचेही नाव असतांनाही त्यांना ग्रामसेवक पदाच्या परीक्षेपासून वचिंत ठेवण्यात आल्याचा प्रकार सोमवारी घडला आहे.
दिवसरात्र अभ्यास करून परीक्षेला बसू न दिल्यामुळे विद्यार्थिनीचे अश्रु अनवार झाले आहे. (Gramsevak Exam) याप्रकरणी मनिबाई सुर्यवंशी यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदन देवून, सदरील प्रकरणाची चौकशी करुन पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली आहे.