अड्याळ (Bhandara) :- पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील सुरबोडी गावाला गोसे धरणामुळे (Gose Dam)बेटाचे स्वरूप आले आहे. गावातील ९३ टक्के शेतजमीन गोसे प्रकल्पात संपादीत करण्यात आली. केवळ तेथील लोकांकडे ७ टक्के शेतजमीन आहे. गावाच्या सभोवताल धरणातील पाण्याने वेढलेले आहे.
शासन-प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ सुरूच
रोजगाराचा अन्य साधन नसताना शासनाने सुरबोडी गावाचे पूनर्वसन केले नाही. वारंवार मागणी करूनही शासन-प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. गावाचे पूनर्वसन, बिबट्याचा (Leopard) बंदोबस्त तसेच शासनाचे सन २०११ चे पत्र तातडीने काढण्यासंबंधी दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी संतप्त ग्रामस्थांनी गोसे धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. आंदोलनस्थळी पूनर्वसन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार पवनी तसेच अड्याळचे ठाणेदार धनंजय पाटील पोलीस ताफ्यासह आंदोलनस्थळी ठाण मांडून होते.