शेतकऱ्यांना कर्ज माफिसह इतर मागणीचे दिले निवेदन
परतवाडा (Congress Tractor Morcha) : अचलपूर व चांदुर बाजार तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वाखाली आज ९ऑक्टोबर रोजी परतवाडा येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राज्यातील महायुती-भाजप भाजप सरकारविरोधात जोरदार किसान ट्रॅक्टर मोर्चा काढला. तब्बल १५० पेक्षा अधिक (Congress Tractor Morcha) ट्रॅक्टरांसह शेकडो शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ते एसडीओ कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला.
मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी तानाशाही नहीं चलेगी!, जो सरकार निकम्मी है, वह सरकार बदलनी है! अशा घोषणांनी अचलपूर व परतवाडा हे जुळे शहर दुमदुमून गेले. मोर्चादरम्यान शेतकऱ्यांच्या वतीने बबलू देशमुख व खा. बळवंत वानखडे यांनी ‘निवेदन’च्या माध्यमातून शासनासमोर प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची सरसकट पीकनुकसान भरपाई द्यावी, विजबिल माफी व तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, खरीप हंगाम हातातून गेल्याने रब्बी हंगामासाठी ‘बी-बियाणे व खते’ अनुदान तत्त्वावर निशुल्क उपलब्ध करावीत व कर्ज माफी दया इत्यादींसह इतर ठळक मागण्या मांडून तिव्र शब्दात संतप्त भावना व्यक्त केल्या.

मोर्चाच्या शेवटी शेतकरी प्रतिनिधींसह (Congress Tractor Morcha) काँग्रेसचे शिष्टमंडळ उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांना निवेदन देण्यासाठी उपविभागीय महसूल कार्यालयावर दाखल झाले. त्यावेळी एसडीओ बळवंत अरखराव यांना निवेदन देण्यात आले,यामुळे मोर्चेकरांच्या भावना दुमदुमल्या.
किसान ट्रॅक्टर मोर्चादरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य वासंतीताई मगरोळे, ब्लॉक कॉंगेस अध्यक्ष नामदेवराव तनपुरे, शहर अध्यक्ष श्रीकांत झोडपे,अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समीती उपसभापती अमोल चिमोटे, राहुल गाठे, सचिदानंद बेलसरे,ओबीसी अध्यक्ष दिनेश वानखडे,संचालक अमोल बोरेकार,रवी पाटील,सुधीर राहटे,ज्ञानदेव पाटील, कैलास आवारे,अनिल पवार,सागर व्यास,श्रीधरराव काळे, देवेंद्र पेटकर,किशोर देशमुख, उत्कर्ष देशमुख,अनिश खान,अजीज खान, इतशाम नबील, जिएम खान, साईद मौलाना, कदीर पहेलवान, निकेश दाभाडे, संजय शेटे,किशोर देशमुख , अरविंदराव लंगोटे , अवधूतराव मातकर , स्वप्निल देशमुख , श्रीकृष्ण वानखडे , शिवानंद मदने , नाही नंदकिशोर भोयर, सुरेश नागापुरे,राजाभाऊ उल्ले,गोपाल शिरभाते , रमेश गुलक्षें, दिलीप सावरकर , जावेद भाऊ , रवींद्र वैराडे , बाबुभाई इनामदार , जीवन का भाई , पंकज कडू , मंगलदास देशमुख , व्यतिरिक्त कार्यकत्यांसह उपेक्षित शेतकरीवर्ग मोठ्या संख्येत या किसान ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाला होता. शेकडो ट्रॅक्टरांवर करपलेली सोयाबीन, ज्वारी आणि हातात मागण्यांचे कटआउट, झेंडे आणि फलक घेऊन निघालेला हा ट्रॅक्टर मोर्चा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शेतकऱ्यांचा संताप आणि निर्धार या दोन्हींचा संगम असलेली ही जनआवाज जुळ्या शहराच्या कानाकोपऱ्यात घुमली.
अचलपूर मतदार संघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही लढाई सुरूच राहील, कर्ज माफीसह सरसकट प्रति हेक्टरी ५० हजार रुपये पीक नुकसान भरपाई त्वरित अदा करावी व रब्बी हंगामी बी-बियाणे व खते अनुदान तत्वावर देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांनी यावेळी दिला. परतवाड्यात (Congress Tractor Morcha) काँग्रेसचा भव्यप्रमाणावर किसान ट्रॅक्टर मोर्चा, खासदार बळवंत वानखडे आणि जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी बबलू देशमुख यांच्या ने तृत्वाखाली शेतक-यांचा सरकारविरोधी जाहीर इशारा. १५०पेक्षा अधिक ट्रॅक्टर, करपलेल्या पिकांसह शेतकऱ्यांचा हक्काचा हुंकार दिला.
राज्याच्या महायुती-भाजप सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. पिकं करपली, कर्जाचा डोंगर वाढला, आणि सरकार झोपेत आहे. आम्ही शेतकऱ्यांचा हक्काचा आवाज थांबू देणार नाही, सरसकट कर्जमाफी, प्रति हेक्टर ५० हजार भरपाई आणि रब्बी हंगामासाठी बी-बियाणे-खते मोफत मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील!
-बबलू देशमुख जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी
हा ट्रॅक्टर मोर्चा म्हणजे फक्त आंदोलन नाही, तर शेतकऱ्यांच्या जगण्याची हाक आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकारने मौन बाळगू नये. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या प्रत्येक हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढेलआणि न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही!
-खा. बळवंत वानखडे


