हिंगोली (Shriram Bangar) : येथील शिवसेनेचे माजी नगर परिषद सभापती व शिवसेनेचे भावी नगराध्यक्ष श्रीराम बांगर (Shriram Bangar) यांच्या वाढदिवसानिमित्त १५ जुलै रोजी विविध ठिकाणी गरजुंना अन्नधान्य किटचे वाटप करून श्रीराम बांगर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांचे बंधू न.प.चे माजी बांधकाम सभापती तथा भावी नगराध्यक्ष श्रीराम बांगर (Shriram Bangar) यांच्या वाढदिवसानिमित्त १५ जुलै रोजी हिंगोलीतील भिम नगर, सुतार वाडा, आई मांतगवाडा, बावनखोली, पारधीवाडा, वडारवाडा, अण्णाभाऊ साठे नगर, महादेववाडी, सिध्दार्थ नगर, नगर परिषद कर्मचारी वसाहत, काली माता परिसर, सात माता परिसर, बेलदारपुरा, चर्मकार गल्ली यांच्यासह इत्यादी परिसरात पाच हजार अन्नधान्य किटचे वाटप गरजु नागरीकांना आ. संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सामाजिक बांधीलकी जपत भावी नगराध्यक्ष श्रीराम दादा बांगर यांनी विविध ठिकाणी विकासात्मक कामे करत नागरीकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
भावी नगराध्यक्ष तथा माजी नगर परिषद बांधकाम सभापती श्रीराम बांगर (Shriram Bangar) यांनी अनेक गरजु विद्यार्थी व विद्यार्थिंनीना अनेक वेळा मदतीचा हात देवून त्यांचे शिक्षण घडविण्याचे काम अनेक वेळा केले आहे. तसेच कळमनुरीचे विधानसभा आमदार संतोष बांगर यांनी विकासात्मक कामे करून कळमनुरी विधानसभा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले आहे. गोर गरीब जनतेच्या मदतीसाठी धावून जाणारे आ. संतोष बांगर व भावी नगराध्यक्ष श्रीराम बांगर (Shriram Bangar) यांनी हिंगोली जिल्ह्यात विकासात्मक कामे करून शिवसेना पक्ष वाढीसाठी मोठी पराकाष्टा केली आहे. त्यांचा वाढ दिवस हिंगोली शहरासह विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करून त्यांना शुभेच्छाचा वर्षाव झाला आहे.
यावेळी शिवसेनेचे युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम, शाम कदम, शिवसेनेचे माजी जि.प. सभापती फकिरा मुंढे, माजी पंचायत समिती सदस्य संतोष गोरे यांच्यासह माजी नगरसेवक गणेश बांगर, सुभाष बांगर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे, माजी जि.प. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, अॅड. अविनाश बांगर, अॅड. पंजाब चव्हाण, गुड्डू बांगर, अॅड. संतोष राठोड, दिनकर गंगावणे यांच्यासह हजारो शिवसैनिक व इतर विविध संघटनाचे पदाधिकारी आदींनी त्यांचा सत्कार केला. हिंगोली शहरामध्ये दिवसभर श्रीराम बांगर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. वाहनाच्या ताफ्यासह श्रीराम बांगर (Shriram Bangar) हे ठिकठिकाणी सत्कार स्विकारण्यासाठी उपस्थित राहिले.




