पुसद (Shivaji Maharaj) : येत्या तीन ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सव सुरू होत आहे. अवघ्या महाराष्ट्र मध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हा सोहळा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. माहूरगडची आई रेणुका देवी यांची ज्योत नेण्यासाठी महाराष्ट्र सह देशातील अनेक सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळे माहुरगडाला येत असतात. असंख्य आपल्या कार्यकर्त्यांसह भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने आई जगदंबेची ज्योत माहूरगडावरून आपल्या शहरांमध्ये आपल्या मंडळामध्ये नेतात.
नगर जिल्ह्यातील( अहिल्यादेवी ) श्री रेणुका माता मित्र मंडळ पानेगाव, श्रीक्षेत्र माहूरगड ते श्रीक्षेत्र पानेगाव असा पायी ज्योत सोहळा वर्ष प्रथम या मंडळाच्या असंख्य कार्यकर्ते माहूर गडावरून ज्योत घेऊन शहरामध्ये दाखल होत असताना येथील सामाजिक कार्यकर्ते दिलखुलास व्यक्तिमत्व तरुणांचे प्रेरणास्थान वैभव फुके यांच्या ही बाब नजरेत आली त्यांनी देशोन्नतीचे प्रतिनिधी दीपक महाडिक यांना सांगितली येथील छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती संपन्न झाली हे विशेष.