पुसद (Gokulashtami) : येथील महाराष्ट्र गवळी समाज संघटनेतर्फे गोकुळाष्टमीनिमित्त भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनानिमित्त गोकुळाष्टमी (Gokulashtami) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरांमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सदर शोभ यात्रेमध्ये अनेक प्रकारच्या झाकिया ट्रॅक्टर वर विराजमान होत्या.कै. शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग क्रमांक दोन येथून या भव्य शोभा यात्रेला सुरुवात झाली तर येथील नेत्याची सुभाषचंद्र बोस चौकामध्ये शामियाना उभारून शोभा यात्रेमध्ये सहभागी असलेल्या भाविक भक्तांसह अबाल वृद्धांचा मान्यवरांच्या हस्ते मानसन्मान करण्यात आला.
याप्रसंगी पुसद विधानसभेचे आ. इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर शोभयात्रा शहरांमध्ये फिरून पुन्हा जिनिंग प्रेसिंग मध्ये महाआरती केल्यानंतर सांगता करण्यात आली. तर या (Gokulashtami) शोभयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये अनेक मुलींनी वेशभूषा केली होती तर अनेक मुले, मुली या झाकीयामध्ये सहभागी झाल्या होत्या. आयोजकांमार्फत या सर्वांचा सन्मान करीत यांना विशेष पारितोषिकेचे वितरण करण्यात आले. हे विशेष तर या दरम्यान शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.