मानोरा (Grand Rally Procession) : शहरात उद्या दि. १४ फेब्रुवारी रोजी जगदगुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंती निमित्त सेवाभक्तांच्या साक्षीने मिरवणूक रॅलीचे आयोजन समाज बांधवांच्यावतीने करण्यात आले आहे. तरी सेवा भक्तांनी मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मंडळाच्यावतीने करण्यात आलेआहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मानोरा शहरातील राहूल पार्क येथील संत सेवालाल महाराज मूर्तीचे पुजन करून संत सेवालाल महाराज चौकापासून भव्य रॅली निघणार आहे. रॅली मिरवणूक दिग्रस चौक मार्गे नाईकनगर येथे शहरातून मार्गक्रमण पोहोचणार असुन नाईकनगर येथे मिरवणुकीचा समारोप होऊन त्याठिकाणी सेवा भक्ताना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. या मिरवणूक रॅली सोहळ्यात तालुक्यातील नायक, कारभारी व सेवा भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




