Hyderabad Murder case :- तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील ८६ वर्षीय उद्योगपती (industrialist) वेलामती चंद्रशेखर जनार्दन राव यांची त्यांच्या नातवाने चाकूने वार करून हत्या केली. मालमत्तेच्या वाटणीच्या वादातून ही हत्या (Murder) झाल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले.
नातवाने चाकूने वार करून केली आजोबांची हत्या
या घटनेदरम्यान, २९ वर्षीय नातू, किलारू कीर्ती तेजा, याचा आजोबांसोबत मालमत्तेच्या वाटणीवरून वाद झाला. तेजा यांना कुटुंबाच्या मालमत्तेतून ४ कोटी रुपये देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु ते त्यावर समाधानी नव्हते. वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात तेजाने आजोबांवर ७० ते ७३ वार केले. या भांडणादरम्यान, तेजाची आई सरोजिनी देवी यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण ती देखील जखमी झाली. त्याला ताबडतोब रुग्णालयात(Hospital) नेण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हत्येमुळे संपूर्ण शहरात खळबळ
आरोपी नातू तेजा नुकताच अमेरिकेहून पदव्युत्तर पदवी पूर्ण करून परतला होता. जेव्हा भांडण झाले तेव्हा तो त्याच्या आईसोबत रावच्या घरी आला होता आणि त्याने हल्ला केला. पोलिसांनी तेजा याला अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या हत्येमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे आणि या दुःखद घटनेने लोक हादरले आहेत. जनार्दन राव कोण होते? जनार्दन राव हे एक प्रसिद्ध उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते होते. जहाजबांधणी, ऊर्जा आणि औद्योगिक उपकरणे (Industrial equipment) यासह अनेक क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते त्यांच्या उदारता आणि सामाजिक सेवेसाठी देखील ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनाने उद्योगात शोककळा पसरली आहे.