धामणगाव रेल्वे (crime news) : डोळ्यात मिरची पूड झोकून भरदिवसा डकैती करणाऱ्या टोळीचा स्थानिक (crime branch) गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर शोध लावला आहे. सात दिवसांपूर्वी भारत फायनान्स कंपनीच्या वसूली कर्मचाऱ्याला जवळपास तीन लाख रुपयांनी भरदिवसा लुटल्याची घटना घडली होती. तालुक्यातील मंगरूळ बायपास रस्त्यावर घडली होती.
डकैतीमधील लुटारूंचा गुन्हे शाखेने लावला शोध
तालुक्यात सात दिवसांपूर्वी घडलेल्या लुटमारीच्या प्रकरणात (crime branch) गुन्हे शाखेला आरोपींचा शोध लावण्यात यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने सदर गुन्ह्यातील सचिन उर्फ शिवा वासुदेव सोळंके वय २५, त्याचा भाऊ ज्ञानेश्वर वासुदेव सोळंके वय २२ दोघेही रा. जांभा बुद्रुक ता. मूर्तिजापुर जि. अकोला व अमरावती जिल्ह्यातील कार्तिक नंदू पवार वय २४ रा. बोरज ता. चांदुर बाजार या तिघांना मुद्देमालासह अटक केली आहे. विश्वासात घेऊन विचारपूस केली. या तीघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून चांदूर बाजार येथील त्या दोघांचा चुलत मामा कार्तिक पवार याला सोबत घेऊन तिघांनी उधारीचे पैसे फेडण्यासाठी व कौटुंबिक कामाकरिता पैशाचे अत्यंत आवश्यकता असल्यामुळे सदरची लूटमार केल्याचे सांगितले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे मोठी कामगिरी
यातील ज्ञानेश्वर हा अमरावती येथे उत्कर्ष फायनान्स कंपनीला काम करून चुकला असल्याने भारत फायनान्स कंपनीचे कर्मचारी वसुली करिता गावोगावी फिरतात व त्यांच्याकडे भक्कम पैसा असल्याच्या माहिती त्याला होती. हे तिघेही घटनेच्या दिवशी सकाळपासून शहरातील या कार्यालयाबाहेर उभे राहून वसुलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची रेकी करू लागले. (crime news) जाणाऱ्यांपैकी लुटता येईल अशा वर्णनाच्या सडपातळ बांधा असलेल्या कर्मचाऱ्यांचा या तिघांनी टार्गेट केले.ठरल्याप्रमाणे पाठलाग करून मंगरूळ दस्तगीर वरून वसुलीची रक्कम घेऊन परत येत असतांना, सुनसान रस्ता पाहून आरोपितांनी मिरचीपूड आदित्य दांडगे याच्या डोळयांत फेकली. कर्ज वसुलीची बॅग हिसकावून पळ काढल्याची हकीकत समोर आली आहे.
दोघे मूर्तिजापूर व एक आरोपी चांदुर बाजार तालुक्यातील
२५ एप्रिल रोजी भरदुपारी साडेतीनच्या दरम्यान भारत फायनान्स कंपनीचा वसुली कर्मचारी आदीत्य राजु दांडगे मंगरूळ दस्तगीर येथून कर्जवसुलीची रक्कम घेऊन परत शहरात येत असताना, मंगरूळ बायपासवर काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर मागून येऊन दोन इसमांनी आदित्य दांडगे यांच्या डोळ्यात मिरची पुड झोकुन त्यांचे जवळ असलेल्या भारत फायनान्स कंपनीच्या बॅग मधील २ लाख ७९ हजार रु रोख व सॅमसंग कंपनीचा टॅब व बायोमेट्रिक मशीन असा एकूण २ लाख ९१ हजार ३३५ रुपयांचा मध्यमान डकैती घालून आरोपी त्यांनी लुटल्याची गंभीर घटना घडली होती. दरम्यान (Amravati Police) दत्तापूर पोलिसात भादवि कलम ३९४,३९२ अधिक ३४ अन्वये डकैती व लुटमरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. कोणताही सबळ पुरावा हाती लागत नसल्याने अज्ञात असलेल्या या आरोपींचा शोध घेणे गुन्हे शाखेसाठी आव्हान करत होते. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांचे पथक आरोपींच्या शोधकामी रवाना झाले होते.
गोपनीय सूत्रांनी दिली माहिती
गुन्ह्याचा समांतर तपास केला असता तांत्रिक कौशल्याच्या आधारावर व गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून सदरचा गुन्हा मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा बुद्रुक येथे रहाणाऱ्या सचिन उर्फ शिवा सोळंके याने त्याच्या साथीदारासह केल्याचे उघडकीस आले. दरम्यान जांभा बुद्रुक येथील ऑटोस स्टॉप वर छापणार असून गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शितापीने सचिन उर्फ शिवा, त्याचा भाऊ ज्ञानेश्वर सोळंके व चांदुर बाजार येथील चुलत मामा नंदू पवार या तीघांनाही अटक केली. सदरची कारवाई (Amravati Police) जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर, पोलीस अंमलदार मंगेश लकडे, अमोल देशमुख चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार चेतन गुल्हाने,रितेश वानखडे, शिवा शिरसाट, सारिका चौधरी, चालक संजय प्रधान, श्याम मते, हर्षद घुसे या पथकाने केली आहे.
घटनेतील आरोपीतांकडून लुटमार केलेल्या रकमेपैकी १ लाख ३० हजार रुपये रोख ,गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी १ लाख ७५ हजार,३ मोबाईल फोन अंदाजित की, ४०हजार असा एकूण ३ लाख ४५हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपी (Amravati Police) दत्तापुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.