अमर रहे,अमर रहे,संजय बंड अमर रहे,च्या घोषणांनी सभागृह दणाणले
अमरावती (Sanjay Band) : माणूस म्हणून जगण्याचा सर्वांना अधिकार आहे. राजे, महाराजे तथा तत्कालीन महापुरुषांना जातिभेदाचा कलंक लावून समाजातील विशिष्ट घटकांनी आपला स्वार्थ साध्य केला आहे. आजही ही लोकं जाति धर्मात तेढ निर्माण करत आहे. जाती धर्माच्या चक्रव्यूहातून बाहेर पडत माणसांच राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करा, ते खरं सुराज्य असेल असे कणखर प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख प्रा. श्याम मानव (Prof. Shyam manav) यांनी केले.
जाती-धर्माच्या चक्रव्यूहातून बाहेर पडा- प्रा. श्याम मानव
लोकनेते माजी आमदार स्व. संजयभाऊ बंड (Sanjay Band) यांच्या जयंती निमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. यानिमित्त्याने महाराष्ट्र बचाओ-संविधान बचाओ अभियान अंतर्गत प्रा. श्याम मानव, संस्थापक संघटक, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तथा ज्येष्ठ राजकिय विश्लेषक यांचे प्रबोधनपर व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध वक्ते दशरथ मडावी, अनिसचे कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, शिवसेनेच्या नेत्या प्रीती संजय बंड (Sanjay Band) , हरीश केदार गणेश जी हलकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव या विषयावर पुढे बोलताना प्रा. श्याम मानव म्हणाले की, हुकूमशाहीला आपण आवर घालू शकतो हे लोकसभेच्या निवडणुकीतून दाखवून दिले आहे. मोदी सरकार बहुमतात असतं तर आज अनेक लोक तुरुंगात असते असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं. परंतु महाराष्ट्राने त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. देशात आज विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात चुकीचे व अवैध काम सुरू आहेत. कायद्याचा धाक लोकांना राहिला नाही याकरिता सध्याचे भाजप सरकार जबाबदार असल्याचेही मानव यांनी सांगितले. अनेक उदाहरण व दाखले देत हे सरकार महाराष्ट्रात राहण्यासारखे नाही तेव्हा येत्या निवडणुकीत भाजप सरकारला घरचा रस्ता दाखवा असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. प्रा.श्याम मानव यांनी भारतीय संविधानाला असलेले धोके, देशा समोर असलेली मोठी संकटे आपल्या पुढच्या पिढीला किती अंधारात नेत आहे. देशासोबतच राज्याची राजकीय स्थिती कशी. समाजात शेतकरी, युवक, बेरोजगारी,महागाई, शिक्षण व आरोग्याची स्थिती काय आहे या सर्व बाबींचा अभ्यास पूर्ण विवेचन केले.
आदिवासी समाजासोबतच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीत 40 वर्ष सेवा करणारे दशरथ मडावी यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून धर्मांध लोकांवर प्रकर टीका केली.या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. या संविधानामुळेच आपला देश एक संघ आहे.या ठिकाणी सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. 2014 पर्यंत या देशात लोकशाही होती परंतु त्यानंतर हुकूमशाही कडे वाटचाल सुरू झाली. देशाला हुकूमशाही कडे नेणाऱ्या लोकांना हद्दपार केले पाहिजे. लोकसभेसारखेच येत्या विधानसभेत सुद्धा महाराष्ट्रातील जनतेनी संबंधितांना घरी बसविण्याची हीच ती योग्य वेळ असल्याचे दशरथ मडावी यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना शिवसेनेच्या नेत्या श्रीमती प्रीती संजय बंड यांनी स्व.संजय बंड (Sanjay Band) यांच्या स्मृतींना उजाळा दिला. संजय बंड हे लोकनेते होते त्यांनी समाजातील शेवटच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपण किती जगलो यापेक्षा या जीवनात आपण काय केलं याबद्दल समाधान व खूप चांगले अनुभव मला आलेले आहे. माणसाचे मूल्यमापन करताना तो किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला महत्त्व आहे. संजू भाऊ बंड यांच्या निधनानंतर तुम्ही मला जो धीर दिला,जे प्रेम दाखविले त्याबद्दल मी आपली सर्वांची ऋणी आहे. संजय बंड यांनी जे कार्य केले ते पुढेही आपण सुरू ठेवू. मला संजय बंड यांची पत्नी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आपले प्रेम आणि सहकार्य मला नेहमीच लाभो अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी उपस्थितांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय बंड यांच्या प्रतिमेचे पूजन करू त्यांना अभिवादन केले. अमर रहे अमर रहे संजय बंड (Sanjay Band) अमर रहे च्या घोषणांनी सभागृहात कार्यकर्त्यांनी संजय बंड यांच्या बद्दल आदरभाव व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश हलकारे, संचालन व आभार प्रदर्शन यांनी केले. कार्यक्रमाला संजय भाऊ बंड (Sanjay Band) यांच्या वर प्रेम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दशरथ मडावी, सुरेश झुरमुरे, ॲड. गणेश हलकारे, हरिष केदार, डॉ. बी. डी. बेलसरे, मनिष सिंघवी, माजी आमदार सुनील देशमुख, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हा बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोळ, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख नानाभाऊ नागमोते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे,उपसभापती भैय्या निक्मळ,प्रदीप बाजड,विलास इंगोले, मिलींद चिमोटे, सुनील खराटे, रामेश्वर अभ्यंकर,पराग गुडधे, बाळासाहेब भागवत, प्रताप भुयार,आशिष धर्माळे,दिनेश सिरसागर,प्रमोद निर्मळ,नितीन घडेकर,प्रफुल राऊत, मनोज देशमुख, प्रकाश मोरटकर, प्रकाश काळबांडे, बाळासाहेब राणे, प्रवीण अळसपुरे, उमेश घुरडे,राजु महल्ले,विकास शेळके,मिथुन सोळंके,श्रीनिवास सरडे,ऐय्याजभाई,संजय देशमुख,अनिल मोहोळ,बंडू बोरकर,प्रकाश कळसकर, सुधीर लसनकर, डॉ. सहदेव पाटील,सुषमा कुलकर्णी,डॉ.उल्का पाटील,विजय कुलकर्णी,संदिप बनसोड,नारायण मेंढे,संजय लोणारकर,प्रकाश पाथरे,दिलीप मेटकर,बाळासाहेब ढोके,
स्वागताध्यक्षीय भाषन – प्रितीताई बंड
प्रस्ताविक – गणेश हलकारे
दशरथ मडावी यांनी वर्तमान राजकिय स्थिती विशद केली.
सुरेश झुरमुरे यांनी महाराष्ट्र बचाओ अभियान प्रस्तावना मांडली
संचालन – हरिष केदार




