सेनगाव तालुक्यातील आजेगाव टी पॉईंटवरील घटना
आजेगाव/गोरेगाव (Groom Death) : सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील चौकात भरधाव वेगातील रेतीने भरलेल्या टिप्परने मोटार सायकलला धडक दिल्याने भावी नवरदेवाचा जागीच मृत्यू (Groom Death) झाला. आरोपींना अटक झाल्या शिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवून आरोपीला ताब्यात घेतले.
सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील गणेश उत्तम तनपुरे (२५) हा मोटार सायकल क्रमांक एम एच ३८ एसी ६६२५ यावरून २१ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ६ च्या दरम्यान वाघजाळीकडे निघाला होता. आजेगाव येथील चौकामध्ये एका अनोळखी वाहनाने मोटार सायकलला धडक दिल्याने वाहनाखाली दुचाकी येऊन तिचा चुराडा झाला. यामध्ये गणेश तनपुरे याचा जागीच मृत्यू झाला. या (Groom Death) घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विनोद झळके, पोलिस उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार अनिल भारती यांचे पथक घटनास्थळी पथक धाऊन आले. या प्रसंगी नागरीकही मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते.
यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर टिप्परनेच मोटार सायकलला धडक दिल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आला. परंतु (Groom Death) आरोपीस अटक जोपर्यंत केली जाणार नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेतल्या जाणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे पोलिस काहीवेळ गोधळून गेले. जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्याने अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील ह्या गोरेगावात दाखल झाल्या.
या दरम्यान वाळूच्या टिप्पर चालकाला तात्काळ अटक करून कारवाई करावी. या मागणीसाठी गोरेगाव पोलिस ठाण्या समोरील मुख्य रस्त्यावर टायर पेटवून आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार संतोष टारफे, संदेश देशमुख, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील, नामदेव पतंगे, नगरसेवक निखिल देशमुख, बी. आर. नायक, प्रविण महाजन आदी सहभागी झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या नेतृत्वात पोउपनि कपिल आगलावे, जमादार विक्की कुंदनानी, गणेश लेकुळे, महादू शिंदे यांच्या पथकाने दुपारी टिप्पर चालक अभिजीत मधूकर सरकटे रा. हिंगोली याला ताब्यात घेतले.
या (Groom Death) अपघातातील टिप्पर क्रमांक एमएच २८ बीबी २१११ हे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणात उत्तम श्रीरंग तनपुरे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात रितसर तक्रार भरधाव टिप्परने मोटार सायकलला धडक दिल्याने कापडसिंगी येथील गणेश उत्तम तनपुरे (२५) याचा जागीच मृत्यू झाला. सदर प्रकरणात पोलिसांनी अभिजीत मधूकर सरकटे याला ताब्यात घेतले असून गोरेगाव पोलिस ठाण्यात रात्री (Groom Death) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.