हरदोली (Groom father death) : लग्नाची घटीका आटोपून मुलीच्या विदाई चा कार्यक्रम येऊन ठेपला असतांना तुमसर तालुक्यातील झारली या गावातील वधुपित्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.२९ एप्रिल ला दुपारी २.३० वाजता लग्न मंडपातच घडल्याने आनंदावर विरजण पडले आहे. गणेश मयराम खरवडे (५४) असे (Groom father death) मृत वधुपित्याचे नाव आहे.
झारली रहिवासी व अल्पभूधारक शेतकरी गणेश मयराम खरवडे यांची कन्या पल्लवी हिचा विवाह भंडारा शहरातील आकाश मंदूरकर या युवकासोबत दि.२९ एप्रिल २०२५ ला निश्चित झालेला होता. मंगळवारी दुपारी १२ वाजता मृतक वधू पित्याने कन्यादान पार पाडीत विवाह सोपास्कार पार पाडले. सनई-चौघड्याचे सूर निघत होते. भोजनाचीही तयारी सुरु होती. लगेच जेवणाच्या कार्यक्रमाची लगबग सुरू होती. पाहुण्यांची वर्दळ सुरू होती.
काही वेळात मुलीच्या विदाई चे कार्यक्रम पार पडणार होते. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. त्यावेळी छातीत अचानक दुखू लागल्याने तो रस्त्यावर कोसळला. मित्र व नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान डॉक्टरांनी त्याला (Groom father death) मृत झाल्याचे घोषित केले.
बातमी लगीनघरी धडकताच आंनदाचे वातावरण शोकाकुल वातावरणात रूपांतरित झाले. कन्या सासरी जाण्यापुर्वीच पित्याचे अंत्यदर्शन घेण्याचा दुर्दैवी प्रसंग पल्लवी व परिवारावर ओढावल्याने उपस्थितांना अश्रू अनावर झाले. या (Groom father death) घटनेने कुटूंबावर जबरदस्त मानसिक धक्का पोहचला आहे. तर गावात या घटनेने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.