परभणी (Parbhani Bazar price) : केंद्र शासनाचे आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत जिल्ह्यात १ ऑक्टोबरपासून खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये मुग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्याकरीता हमीभाव केंद्र सुरु केली आहे. नाफेडकडून ४ हजार ८९२ रुपये प्रति क्ंिवटल भाव जाहिर केला आहे. बाजारापेक्षा अधिक भाव मिळत आहे. मात्र उत्पन्नच घटले आहे. त्यामुळे नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
परभणी जिल्ह्यात १ ऑक्टोबरपासून नाफेडच्या नोंदणीकृत केंद्रावर सोयाबीन, उडीद, मुग खरेदीसाठी नोंदणी सुरु झाली आहे. खरेदीसाठी जिल्ह्यात ८ केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. २० होऊनही शेतकर्यांचा नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कारण यंदा परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. कापूस, सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. उरल्या सुरल्या पिकांवर कीडीचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही. उत्पन्नात प्रचंड घट झाली. काही शेतकर्यांनी तर सोयाबीनच्या पिकावर नांगर फिरवला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या शेतकरी बाजारात सोयाबीन घेऊन विक्रीसाठी येत आहेत.
सोयाबीनला ४ हजार ३०० ते ४ हजार६०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. शासनाने ४ हजार ८९२ रुपये प्रति क्ंिवटलचा भाव जाहिर केला आहे. १६ ऑक्टोबर पर्यंत २ हजार ४८० शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. शेतकर्यांचा केद्रावर नोंदणीला प्रतिसाद मिळत नाही. उत्पन्नच नाही तर विकायचं काय ? असा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.
जिल्ह्यात आठ खरेदी केंद्र निश्चित ह आतापर्यंत २ हजार ४८६ शेतकर्यांनीच केली नोंदणी
जिल्ह्यात या केंद्रावर होणार
नाफेडमार्फत सुरु करण्यात आलेली खरेदी केंद्र या प्रमाण परभणी तालुका सह खरेदी विक्री संघ, नवा मोंढा परभणी, जिंतुर तालुका जिनींग अॅन्ड प्रेसींग सह सो. लि. जिंतूर, पूर्णा तालुका सह खरेदी विक्री संघ, मोंढा पूर्णा, मानवत तालुका सह खरेदी विक्री संघ, मार्वेâट यार्ड मानवत, स्वस्तिक सुशिक्षित बेरोजगार सेवा सह संस्था, मार्वेâट यार्ड, पाथरी, स्वप्नभूमी सुशिक्षित बेरोजगार सेवा सह संस्था, सोनहारी वेअरहाउस, शेळगाव रोड, सोनपेठ, तुळजाभवानी कृषी विकास सेवा सह संस्था म. बोरी ता. जिंतूर, तुळजाभवानी कृषी विकास सेवा सह संस्था म. बोरी, मार्कट यार्ड, सेलू यांचा समावेश आहे.
परभणी जिल्ह्यातील आठ केंद्रावर नाफेड केंद्रावर सोयाबीन, उडीद, मुग आदी पिकांच्या खरेदीसाठी नोंदणी सुरु आहे.शेतकर्यांनी आपल्या तालुक्यातील संबंधित केंद्रावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी करीता सोबत खरीप हंगाम २०२४-२५ मधील सातबारावर ऑनलाईन पिकपेरा नोंद, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे.
– कुंडलिक शेवाळे, जिल्हा पणन अधिकारी