नवी दिल्ली (Gurmeet Ram Rahim) : बहुचर्चित रणजित सिंह (Ranjit Singh) हत्या प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (High Court) राम रहीमला मोठा दिलासा देत त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी (CBI Court) सीबीआय कोर्टाने (Ram Rahim) राम रहीमला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गुरमीत राम रहीमचे वकील जतिंदर खुराना यांनी सांगितले की, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाच्या आदेशात बदल केला. यातील पाचही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. राम रहीमने जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. आज त्यांच्या अपिलावर निर्णय देताना (High Court) उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे.
मी निराश झालो आहे, पण मी हार मानणार नाही
डेरा मुखी (Ram Rahim) राम रहीमची उच्च न्यायालयाने (High Court) निर्दोष मुक्तता केल्याबद्दल रणजित सिंह यांचा मुलगा जगसीर याने निराशा व्यक्त केली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीबीआय कोर्टाने आपल्याला न्याय दिला होता. आता हायकोर्टाने डेरा मुखीची निर्दोष मुक्तता केल्याचे ते म्हणाले. हा अन्याय आहे पण, आम्ही हार मानणार नाही. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे रणजित सिंह यांच्या गावातील लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. (CBI Court) सीबीआयच्या तपासानंतर कोर्टाने या प्रकरणात डेरा मुखीला शिक्षा सुनावली होती. मात्र आता हायकोर्टात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
रणजित सिंग हे शिबिराचे व्यवस्थापक
रणजित सिंग हा सिरसा डेराचा व्यवस्थापक होता. 22 वर्षांपूर्वी एका संशयावरून रणजित सिंगची हत्या करण्यात आली होती. रणजित सिंग हा कुरुक्षेत्र, हरियाणाचा रहिवासी होता. 10 जुलै 2002 रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या (murder case) करण्यात आली होती. एका निनावी साध्वीने माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना पत्र लिहिले. या पत्रात (Ram Rahim) राम रहीमच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. साध्वीच्या लैंगिक शोषणाचे निनावी पत्र लिहायला रणजित सिंगने आपल्या बहिणीला मिळवून दिल्याचा डेरा व्यवस्थापनाला संशय होता. हे तेच निनावी पत्र आहे. जे सिरसाचे पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी त्यांच्या ‘पुरा सच’ या संध्याकाळच्या वृत्तपत्रात प्रकाशित केले होते. त्यामुळे 24 ऑक्टोबर 2002 रोजी पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळ्या झाडून हल्ला (murder case) करण्यात आला होता. रामचंद्र यांचे 21 नोव्हेंबर 2002 रोजी अपोलो हॉस्पिटल, दिल्ली येथे निधन झाले.
#WATCH चंडीगढ़: पंजाब और हरियाणा हाई कोर्ट ने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह और 4 अन्य आरोपियों को 2002 के रणजीत सिंह हत्या मामले में बरी कर दिया है।
गुरमीत राम रहीम के वकील जतिंदर खुराना ने बताया, ''…माननीय पंजाब और हरियाणा हाई कोर्ट ने निचली अदालत के आदेश को बदल… pic.twitter.com/8nVhO8L2y4
— ANI_HindiNews (@AHindinews) May 28, 2024
2003 मध्ये तपास सीबीआयकडे सोपवला
पोलिस तपासावर असमाधानी रणजित सिंग यांचा मुलगा जगसीर सिंग याने जानेवारी 2003 मध्ये (High Court) उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय तपासाची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने मुलाच्या बाजूने निकाल देत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. या प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयने राम रहीमसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. 2007 मध्ये न्यायालयाने आरोपींवर आरोप निश्चित केले होते. या प्रकरणात सुरुवातीला डेरामुखीचं नाव नसलं तरी 2003 मध्ये (CBI Court) सीबीआयकडे तपास सोपवण्यात आल्यानंतर २००६ मध्ये (Ram Rahim) राम रहीमचा ड्रायव्हर खट्टा सिंग याच्या वक्तव्याच्या आधारे या (murder case) हत्या प्रकरणात डेराप्रमुखाचं नाव समोर आलं होतं. 2021 मध्ये सीबीआय कोर्टाने गुरमीत राम रहीमसह 5 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. साध्वी लैंगिक शोषण प्रकरणी (Ram Rahim) राम रहीम सिंगला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या राम रहीम रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहे.