मूर्तिजापूर दर्यापूर मार्गावरील घटना
कारंजा/वाशिम (Karanja Accident) : वेळप्रसंगी रुग्णांना जीवदान देणाऱ्या रुग्णवाहिकेचाच अपघात झाला. ही घटना 25 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास मुर्तीजापुर-दर्यापूर मार्गावरील लाखपुरी गावाजवळ घडली. या (Karanja Accident) अपघातात चालक रमेश देशमुख थोडक्यात बचावले.
सूत्रांच्या माहितीनुसार कारंजा येथील गुरु मंदिर रुग्णवाहिकेने चालक रमेश देशमुख हे शनिवारी रात्री वर्धा येथून अकोट येथे एक रुग्ण घेऊन गेले होते. तेथून दर्यापूर मुर्तीजापुर मार्गे कारंजा परतत असताना मार्गातील लाखपुरी गावाजवळील एका वळणावर रुग्णवाहिकेच्या एका बाजूच्या चाकातील व्हालट्यूब अचानकपणे निघाली. त्यामुळे चाकातील हवा गेली आणि रुग्णवाहिका चार वेळा पलटी झाली. या (Karanja Accident) घटनेत रुग्णवाहिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र दैव बलवत्तर म्हणून चालक रमेश देशमुख हे थोडक्यात बचावले.
या (Karanja Accident) घटनेत त्यांच्या पायाला किरकोळ इजा झाली असून घटनेनंतर त्यांना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रमेश देशमुख यांच्या अपघाताची बातमी समजताच अनेकांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी रमेश देशमुख यांनी आतापर्यंत केलेल्या रुग्णसेवेमुळे ते बचावले असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.