परभणी/पालम (Parbhani):- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालम तालुक्यातील केरवाडी येथे २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास केलेल्या कारवाईत २१ हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि एक दुचाकी मिळून १ लाख १ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर पालम पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटक्याचा मोठी चैन जिल्ह्यात सक्रिय
स्थागुशाचे सपोनि. पांडुरंग भारती, पोलीस अंमलदार निलेश परसोडे, रंगनाथ दुधाटे, भदर्गे, परसराम गायकवाड, दिलीप निलपत्रेवार यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत होते. या पथकाला दोन व्यक्ती त्यांच्या दुचाकीवर गुटखा घेवून येत आहेत, अशी माहिती मिळाली. या माहितीवरुन केरवाडी येथे सापळा लावत पोलिसांनी एम.एच. २२ बी.बी. ०२८१ या क्रमांकाची दुचाकी थांबविली. सदर वाहनावर असलेल्या इसमांजवळ २० हजाराचा गुटखा मिळून आला. या प्रकरणी योगेश सोनटक्के, राजेश्वर वाडेवाले यांच्यावर पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.