लातूर (Latur Crime Branch) : 16 लाख 33 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करीत बीड जिल्ह्यातील एका विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. 13 डिसेंबरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, एका वाहनातून तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी व कर्नाटक ते अंबाजोगाई व्हाया उदगीर वाहतूक होणार आहे.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून (Latur Crime Branch) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उदगीर तालुक्यामध्ये सापळा लावला. तसेच सदर गाडीचा जवळपास 20 किलोमीटर पाठलाग करून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारे वाहन नळेगावजवळ घरणी मोड परिसरामध्ये ताब्यात घेतले. हुंडाई कंपनीचे क्रेटा गाडी (क्रमांक एम.एच. 24/ ए.डब्ल्यू. 9899) सह 16 लाख 33 हजार 700 रूपयाचा गुटखा व सुगंधित तंबाखू , कारसह जप्त करण्यात आले.
सूरज दत्तात्रेय खंडापुरे, (वय 32 वर्ष, राहणार साळुंकवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड) यांच्याविरुद्ध (Latur Crime Branch) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे चाकूरचे पोलीस अधिकारी,अंमलदार करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरूरे, चालक अमलदार प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.