हिंगोली(Hingoli):- कळमनुरी बायपास राष्ट्रीय महामार्गावरील धानोरा शिवारात कळमनुरी पोलिसांनी गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनाला पकडून त्याची चौकशी केली असता त्यामध्ये जवळपास 31 लाखाचा गुटखा सापडला आहे.
चौकशी केली असता त्यामध्ये जवळपास 31 लाखाचा गुटखा सापडला
याबाबत अधिक माहिती अशी की १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संशयावरून तपासणी (Inspection) केलेल्या आयशर टेम्पो मध्ये ४५ पोते गुटखा आढळून आला आहे. सदर गुटखा (Gutkha) कर्नाटकमधून(Karnataka) आणण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले असून पोलिसांनी चालकाची चौकशी सुरु केली आहे. सण, उत्सव असल्यामुळे सर्व पोलिस अधिकार व कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कळमनुरी पोलिसांनी गावात तसेच मुख्य मार्गावर बंदोबस्त ठेवला होता.
पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी टेम्पोची पोलीस ठाण्यात आणून तपासणी
कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावरून एका आयशर टेम्पोतून(Eicher Tempo) गुटखा वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक बसवंते, उपनिरीक्षक सतीष ठेंगे, कांगणे, जमादार फुले, कांबळे, प्रशांत शिंदे, गजानन होळकर, कैलास सातव विलास बांगर यांच्या पथकाने १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वाहनांची तपासणी सुरु केली. यावेळी धानोरा शिवारात आलेल्या एका आयशर टेम्पोला थांबविल्या नंतर चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी टेम्पोची पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यात गुटख्याची 45 पोते आढळून आली.
तपासणी केली असता त्यात वजीर गुटख्याचे ४५ पोते आढळून आलेे
पोलिसांनी सदर टेम्पो क्रमांक kA 41,A4122 यांना कळमनुरी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तपासणी केली असता त्यात वजीर गुटख्याचे ४५ पोते आढळून आलेे आहे. या पोत्यांची किंमत २१ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुटख्याची पोते व आयशर असा एकूण ३१ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांनी चालकाची प्राथमिक चौकशीत केली असता त्याने कर्नाटक राज्यातील बिदर येथून गुटखा भरून नेण्याची सांगण्यात आले होेते. मात्र नेमके गुटखा कोठे द्यायचा याची माहिती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे आता पोलिसांनी त्याच्या मोबाईलवरून बिदरमधील व्यक्तीची माहिती घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.