रिसोड (Gyan Deep School) : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव आज मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या महोत्सवासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जीवन विकास शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय अमित भाऊ खडसे पाटील उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सुरेश देशमुख सर तसेच शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका तवर मॅडम उपस्थित होत्या. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय खानझोडे सर यांनी केले. प्रास्ताविक पर भाषणात त्यांनी शाळेच्या २५ वर्षाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय सरनाईक मॅडम यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेसाठी अविरत काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सर्वप्रथम आदरणीय अमित भाऊ खडसे पाटील यांनी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सुरेश देशमुख सर यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. त्यानंतर आदरणीय भुतेकर सर, पांडे सर व सरनाईक मॅडम यांचा सुद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यानंतर क्रीडा सप्ताहात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आदरणीय जोगदंड सर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला आदरणीय आखाडे सर, राठोड सर पांडे सर, धामणकर मॅडम, पडघान मॅडम,शिंदे मॅडम, वाते मॅडम उपस्थित होते. हा रौप्य महोत्सव शाळेच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण ठरला.




