कळमेश्वर च्या रथयात्रा महोत्सवाला 317 वर्षाचा इतिहास
कळमेश्वर (Kalameshwar Rath Yatra) : सुमारे 317 वर्षाचा संसस्कृतीक वारसा जोपासनारा व रात्रभर चालणारा कळमेश्वर ऐतिहासिक रथयात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी जोड मारोती चौक मित्र मंडळातर्फे चौकात आयोजित विशेष आकर्षण दहीहंडी यावर्षी रद्द करण्यात आली होती शहरात ठिकठिकाणी उभारलेल्या विविध देखाव्यांसह चित्ररथा नि भाविकांचे लक्ष वेधून घेतले. यात्रे दरम्यान पूर्वसंध्ये ला आयोजित सुगम संगीत , संगीत खडा तमाशा, जागरण, फटाक्यांची आतिषबाजी, व्यायामशाळांची प्रात्यक्षिके, पारंपरिक दिंड्या, डिझे व बाभूळगाव येथील संगीत धुमाळ यात्रेची वैशिष्ट्ये ठरली.
जोड मारुती चौकातील विशेष आकर्षण दहीहंडी यावेळेस रद्द
यावेळी शहर विघुत रोषणाई, स्वागतद्वार व पताकांनी नव् वधुप्रमाणे नटले होते. (Kalameshwar Rath Yatra) रामललाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विविध सामाजिक संघटनांकडून खघायपदार्थ्यांसह प्रसादाचे वितरण करण्यात आले. रथयात्रेला विदर्भासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक सहभागी झाले होते. मंगळवारी रात्री 12 वाजता काढण्यात आलेल्या रथयात्रेचा समारोप बाजार चौकामध्ये पहाटे 3 वा. करण्यात आला.
रथयात्रेला येथील प्राचीन श्रीहरी महाराज मंदिरातून (Kalameshwar Rath Yatra) रात्री 12 वाजता आमदार आशिष देशमुख,शरद पाठक, शशिकांत पाठक, राजुभाऊ पाठक यांच्या हस्ते पूजा अर्चना करून सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार, जय श्रीराम तळ्याची पार चे आयोजक राहुल धारपुरे, रवी खडसे, अप्पू पटेल, मुन्ना भुरे, मंगेश मांगे तळ्याची पार मित्र परिवाराचे आयोजक राजेंद्र सुके, राजेंद्र चोरे, वैभव घोंगे,विवेक प्रधान, नितीन काळबांडे, अजय मुंडवाईक, किशोर चालखोर, अंशुल भम्मरकर, सुमेर भोस्कर, नंदू ढोले, चेतन घुमडे, हरीश चांदुरकर, किशोर महाजन, दिनेश जोशी, सार्थक मक्कासरे, रणधीर सोनोने, विनोद मते,सतीश नांदे राजेश श्रीखंडे , मंगेश गमे,माजी न. प. सदस्य घणश्याम मक्कासरे, धनराज देवके,कळमेश्वर पालिकेचे मुखयाधिकारी तथा प्रशासक आकाश सुरडकर , अँड.प्रकाश टेकाडे, दिलीप धोटे, कृष्णाजी बगडे,गणेश लंगडे,रथयाञा उत्सव समीती अध्यक्ष नामदेव वैद्य, पिंटू निंबाळकर व इतर सर्व माजी नागरसेवकांसह परिसरातील गनमान्य नागरिक व्यावसायिक उपस्थित होते.
तळ्याची पार मित्र परिवाराने घडवले कालीमातेचे दर्शन
या (Kalameshwar Rath Yatra) प्रसंगी पारंपरिक दिंड्या, भजनी मंडळ, डीजे, संगीत धुमाळ, च्या गजरात श्रीराम चंद्राच्या पालखीसह पवनपुत्र हनुमान विराजमान असलेला व विघुत रोषणाईने सजलेला तीन मजली लाकडीरथ शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आला. कळमेश्वर शहरात चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेच्या द्वितीयेला ही रथयात्रा भरत असते. ती परंपरा सुमारे 317 वर्षापासून निरंतर सुरू आहे. तीन मजली असलेला लाकडी रथ दोरखंड बांधून ओढण्याची परंपरा आहे. यात्रे दरम्यान बाजारपेठ परिसरात हनुमान व्यायामशाळा व शिवाजी आखाडा यांच्या वतीने कसरतीचे साहसी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
जय श्रीराम तळ्याचे पार मित्रपरिवारा च्या आकर्षक झाक्या ठरल्या लक्षवेधी
यात्रे (Kalameshwar Rath Yatra) दरम्यान ठिकठिकाणी आकर्षक देखावे उभारण्यात आले होते. बुधवारी सकाळी 8 वाजतापासून ते रात्री 10 पर्यंत संगीत खडा तमाशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. याकरिता ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर बाजारात थाटण्यात आलेल्या खेळणांच्या साहित्यांसह जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी चिमुकलयासह महिलांनी चांगलीच गर्दी केली होती. राथयात्रेची जय्यत तयारी नियोजनबद्ध अनेक दिवसांपासून सुरू असते. या करीता परिसरातील नागरिक सहकार्य करतात. यात्रेदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून सहाय्य पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या वतीने पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील विविध विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवाबदारी पार पडली.
डुप्लिकेट पुष्पाने केले कळमेश्वरकरांचे मनोरंजन
327 वर्षांचा सांस्कृतिक वारसा जोपासणारा व रात्रभर चालणारा ऐतिहासिक (Kalameshwar Rath Yatra) कळमेश्वर रथयात्रा महोत्सव मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात ठिक ठिकाणी उभारलेल्या विविध देखाव्यांनी भाविकांना रिझवले. यावेळी यात्रेदरम्यान नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी, व्यायाम शाळेची प्रात्यक्षिके, संगीत खडा तमाशा, पारंपारिक दिंडीसह, डीजे व धुमाळचा समावेश, स्वागत द्वाराने शहराची सजावट, रथयात्रा मार्गांवर खाद्यपदार्थांचे वितरण, यात्रेचे ठळक वैशिष्ट्ये होती. अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या या यात्रेसाठी विदर्भाच्या कानाकोपर्यातून लाखांवर भाविकांनी हजेरी लावली होती.शहरात रथयाञेसाठी घरोघरी पाहून्यांची वर्दळ मोठी होती.
श्री रंगशाळा कळमेश्वर कडून 60 कलावंताद्वारे विठ्ठल दिंडी नृत्य, लेझीम नृत्य
राञी 12.45 वा. प्रभुश्रीरामांच्या पालखीचे दर्शन व दोरखंडाने बांधलेला एतिहासिक रथ ओढण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (Kalameshwar Rath Yatra) रथयात्रेनिमीत्त गावकरी व सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने शहराला नववधूप्रमाणे सजविण्यात आले होते.ठिकठिकाणी रथयाञेचे भाविकांनी स्वागत केले. चौकाचौकात रथयात्रा पाहण्यासाठी लहानांपासून तर थोरा मोठ्यांपर्यंत हजारो भाविक जमले होते.रथापुढे असणाऱ्या दिंडी भजन मंडळ बँड पथक धुमाळ व डीजेच्या संगीतावर वारकऱ्यांसह तरुणाई थिरकत होती.
दरम्यान फटाक्यांची आतषबाजी व “जयश्री रामा” च्या जयघोषाने कळमेश्वर नगरी दुमदुमली होती. दोन्ही आखाड्यातील पहिलवानांनी पारंपारीक कसरतीची सहाशी प्रात्यक्षिके सादर केली. प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.शहराची परिक्रमा करीत रथयात्रा बाजार चौकातील हनुमान मंदिराजवळ पहाटे 3 वाजता पोहचली. (Kalameshwar Rath Yatra) रथयात्रेच्या मार्गावर तुळजादेवी, शिवाजी महाराज,गजानन महाराज, साईबाबा आदी देव देवतांचे देखावे उभारण्यात आले होते. बुधवारी बाजारचौक येथे सकाळी 8 वाजतापासून दूय्यम गमतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या (Kalameshwar Rath Yatra) रथयाञेची तयारी नियोजनबद्ध पद्धतीने अनेक दिवसांपासून सुरु असते. यात स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांचे सहकार्य मोलाचे असते. यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मनोज काळबांडे यांचे नेतृत्व चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यासाठी नागपूर येथून अधिक कुमक बोलावण्यात आली होती. यामध्ये दंगा नियंञन पथकाचा समावेश होता.
सामाजिक संघटनांकडून खाद्यपदार्थांचे वितरण
रथयात्रेच्या (Kalameshwar Rath Yatra) मार्गावर शहरातील सामाजिक संघटना व शिवस्वराज्य संघटना,जोडमारोती मिञमंडळ,बाबा बर्फाणी मिञ मंडळ,तळाचीपाळ मिञमंडळ,माळी समाज संघटना,शहर भाजपा,साईबाबा भक्तगण,युवा व्यापारी मिञ मंडळ, श्रीरंग शाळा आदिंसह अनेक व्यावसायीक नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून पोहा, मसाले भात, सरबत व साबूदाना,बूंदा,मठ्ठा,जिलेबी आदि खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात आले.
जय श्रीराम तळाची पाळ मिञ परिवारातर्फैब्राम्हणी फाटा चौक ते बाजारचौक पर्यंत याही वर्षी सात चिञरथांची मिरवनूक डिजे,धूमाळ,बॅंडपथकाच्या गजरात आकर्षक रोषनाई,फटाक्यांच्या आतीषबाजीत दाखल केल्याने या रथयाञेला आणखी काही रंगतच चढली. जय श्रीराम तळाची पाळ मिञ मंडळाच्या झाक्या डुप्लिकेट पुष्पा तर तळ्याची पार मित्र परिवारातर्फे आयोजित काली माता दर्शन थ्रीडी टेक्नॉलॉजी वापरून आयोजित केलेला डीजे लक्षवेधी ठरला. शेकडो वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या रात्रभर चालणाऱ्या उत्सवामध्ये दूरवरून लोक येत असतात परंतु पोलीस प्रशासनाने लवकरच डीजे धुमाल बंद करण्यासाठी सांगितल्याने लाखो रुपये खर्चून मनोरंजनासाठी आणलेली कार्यक्रम आयोजकाकडून रद्द करावी लागल्याने आयोजकांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोरवी नृत्याचे सादरीकरण
श्री रंगशाला कळमेश्वर प्राचीन परंपरा लाभलेल्या रथयात्रा महोत्सव मध्ये घेऊन येत आहे. 60 कलावंताद्वारे विठ्ठल दिंडी नृत्य, लेझीम नृत्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोरवी नृत्याच्या कळमेश्वर – ब्राह्मणी परिसरातील महिला,मुलीचा कलाविष्काराने एक वेगळीच रंगत या रथ उत्सवात पाहायला मिळाली. तसेच दिनांक 16 एप्रिल ला सिंदखेड राजा येथून निघालेल्या (Kalameshwar Rath Yatra) जिजाऊ रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्र भर भ्रमण करत कळमेश्वरला 16 एप्रिल ला सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ येणार असल्याने नागरिकांमध्ये याची उत्सुकता होती. विविध झाक्यांनी भाविकांना रिझविले.
फटाक्यांची आतषबाजी व्यायाम शाळेची प्रात्यक्षिके संगीत खडा तमाशा विदर्भातून सूमारे दिड लाखांवर पहिल्यांदाच भाविकांची हजेरी विघूत रोषनाई व स्वागत द्वाराने शहर नटले. पारंपारिक दिंड्यांसहा डीजे व धुमाळ यांचा समावेश सामाजिक संघटनांचा सहभाग, खाद्यपदार्थांचे वितरण, विविध राजकीय पुढाऱ्यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती.




