परभणी (Hajj pilgrimage) : शहरातून हज यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक उपस्थित होते. मुस्लिम धर्मियांचे पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या सौदी अरेबियातील मक्का येथील हज यात्रेसाठी परभणीतून यात्रेकरू रवाना झाले आहेत. (Haj Committee) हज कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून शेकडो (Hajj pilgrimage) हज यात्रेकरू जिल्ह्यातून जात आहेत. दि. 29 मे रोजी विशेष विमानाने सौदी अरेबियाकडे ते रवाना होणार आहेत.
मुंबईपर्यंत सर्व (Hajj pilgrimage) यात्रेकरूंना पोहचवण्यासाठी योग्य नियोजन आणि विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी यात्रेकरूंना निरोप आणि शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक तसेच विविध सामाजिक क्षेत्रातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 45 दिवस असणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य (Hajj pilgrimage) हज कमिटीकडून यात्रेकरुंना विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात आले आहे.