वसमत (Water Supply) :शहरात पाणीटंचाईचा (water shortage) कहर झाला आहे. पंधरा पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. त्यामुळे महिला त्रस्त झाले आहेत. तर पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या महिलांनी आज (Vasmat Municipality) वसमत नगरपालिकेवर हंडा मोर्चा (Handa Morcha) काढून संताप व्यक्त केला. मनसेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. शहरात (Water Supply) पाणीपुरवठा प्रारंभ केल्याशिवाय मोर्चेकरी नगरपालिकेतून हटणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला होता. शहरात पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरच मोर्चेकरी रवाना झाले शहरात नियमित पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी दिले.
पाणी पातळी खालावली, बोअर आटले
वसमत शहरात (Vasmat Municipality) पाणी पुरवठ्याचे नियोजन ढासळले आहे पाणीपुरवठा कधी होईल, याचे काहीही नियोजन वेळापत्रक नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कडक उन्हाळा सुरू आहे. शहरातील पाणी पातळी खालावली असल्यामुळे बोअर आटलेले आहेत. त्यामुळे शहरात नळाच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. शहराच्या अनेक भागात अनियमित पाणीपुरवठा आहे. सध्या शहरात पंधरा दिवसापासून (Water Supply) पाणीपुरवठा झाला नसल्याने, महिला त्रस्त होऊन गेल्या आहेत. (water shortage) पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने नगरपालिकेवर सोमवारी हंडा मोर्चा काढण्यात आला.
तातडीने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना
शहराच्या विविध भागातून महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी मोर्चेकरांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून नियमित (Water Supply) पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. शहरात लगेच पाणी सोडावे अशी मागणी केली. मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी तातडीने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या शहरात (Water Supply) पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मोर्चेकरी नगरपालिकेतून बाहेर पडले. या मोर्चात मनसेचे तालुकाध्यक्ष काशिनाथ टोम्पे , महिला तालुकाध्यक्ष शिवकांताबाई दिंडूरकर , राहुल पारधे प्रभाकर कावळे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी व शहरातील मंगळवार पेठ , शहर पेठ, बुधवार पेठ यासह विविध भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.