Pune Crime:- काल दुपारी चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मूळा मुठा नदी पात्रात एक मृतदेह(dead body) तरंगत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. शीर आणि हात पाय नसलेला हा मृतदेह विवस्त्र अवस्थेमध्ये मुळा मुठा नदीच्या पात्रात आढळला.
मृतदेह विवस्त्र अवस्थेमध्ये मुळा मुठा नदीच्या पात्रात आढळला
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. शहरात मुळा मुठा नदीच्या पात्रात स्त्री जातीचा मृतदेह आढळून आला आहे. स्त्री चे वय अंदाजे 50 ते 60 असून ती पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी आहे. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार मृतदेह सापडण्यापूर्वी त्याचा दोन दिवस अगोदर मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. मृतदेहाचे ससून रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन(Autopsy) करण्यात आले आहे. चंदन नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.