Pusad:- तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशन (Police Station) अंतर्गत येणाऱ्या खंडाळा येथे एका 28 वर्षीय युवकाने त्याच्या राहत्या घरात स्लॅब(Slab) ला लटकून आत्महत्या केल्याची घटना आली आहे. दि.29 जून च्या रात्री च्या दरम्यान घडली.
घरात स्लॅबच्या कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या
प्राप्त माहितीनुसार, खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खंडाळा येथील राहिवासी प्रशांत भगवान इंगोले वय 28 वर्ष रा.खंडाळा याने आपल्या राहत्या घरात स्लॅबच्या कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केली. सदरची घटना दि. 29 जून रोजी च्या रात्रीच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले. प्रशांतचा लटकलेला मृतदेह (Deadbody) प्रशांतच्या चुलत वहिनीने बघितला. व सर्वांना या घटनेबद्दल माहिती दिली. घरच्यांनी तात्काळ खंडाळा पोलीस स्टेशन येथे संपर्क केला व त्यांना घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय (hospital)पुसद येथे शवविच्छेदनासाठी पाठवले. मृतक प्रशांत भगवान इंगोले हा एकुलता एक मुलगा होता. घरी शेती असल्यामुळे तो शेतीच सांभाळायचा. वडील रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर (Retired Forest Officer)आहे. मृतक प्रशांत चे लग्न झाले असून पत्नी सुमारे पाच ते सहा महिन्यापासून माहेरी आहे. प्रशांत यास मूलबाळ नाही. मृतक प्रशांत हा प्रॉपर पुसद येथे राहायचा तो काही दिवसांकरिता खंडाळा येथे राहायला गेला होता. प्रशांत ने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट आहे. मृतक प्रशांत पश्चात त्याचे आई वडील, पत्नी, चार बहिणी असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुकर बळीराम पवार हे करीत आहे.