हिंगोली (Har Ghar Tiranga) : स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ मोहीम (Har Ghar Tiranga) आजपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी सक्रिय सहभागी होत हे अभियान राबविण्यात येत आहे. ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेत आज सकाळी तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी नगर परिषदेतील अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्याधिकारी उमेश शेंबाडे, श्याम मानवटकर, शहर अभियंता रत्नाकर अडशिरे, प्रकल्प अधिकारी पंडित म्हस्के यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षीही आजपासून 15 ऑगस्टपर्यंत ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येत आहे. या (Har Ghar Tiranga) अभियानात प्रामुख्याने 9 उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात (Har Ghar Tiranga) तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत आज शुक्रवार, दि. 9 ते 15 ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच (Har Ghar Tiranga) घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक घरावर दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. प्रत्येक गाव, शहरामध्ये राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा, यासाठी पोस्ट ऑफिस, खादी ग्रामोद्योग, खाजगी आस्थापना, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तसेच जिल्हा, शहरातील महत्वाच्या शासकीय इमारतीवर तिरंगा रोषणाई करण्यात येणार आहे. (Har Ghar Tiranga) हर घर तिरंगा हे अभियान राज्यभरात राबविण्यात येत असून, तिरंगा प्रतिज्ञा या उपक्रमामध्ये नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.