परभणी (Parbhani):- व्यवसायात नुकसान आल्याने माहेरहून सात लाख रुपये घेऊन ये, नसता तुझ्या नावावर पतीला बँकेचे लोण काढून दे, असे म्हणत विवाहितेचा छळ (Harassment)करण्यात आला. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्या मंडळीवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासरच्या मंडळीवर नवा मोंढा पोलिसात गुन्हा
विशाखा सहजराव या विवाहितेने तक्रार दिली आहे. लग्नानंतर काही दिवसांनी पतीला व्यवसायामध्ये नुकसान (damage) आले. व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या पतीला समजावण्याचा प्रयत्न केला असता सासरच्यामंडळींनी पैशांची मागणी करत विवाहितेचा शारीरिक(physical), मानसिक छळ केला. या बाबत भरोसा सेलकडे तक्रार देण्यात आली मात्र तडजोड झाली नाही. विवाहितेच्या फिर्यादीवरुन किशोर सहजराव, अशोक सहजराव, गयाबाई सहजराव, नितीन सहजराव, मालन हरबोले यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.