चिखली (Buldhana) :- बँक कर्जाचा हप्ता मागण्यासाठी सदस्य महिलेच्या घरी गेलेल्या सदस्य पतीने घरात बोलावून गटाच्या अध्यक्ष महिलेची छेडछाड केली. अशा महिलेच्या तक्रारी वरुण पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सदस्य पतीने घरात बोलावून गटाच्या अध्यक्ष महिलेची केली छेडछाड
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात रमाबाई नावाचा बचत गट आहे आणि या बचत गटामध्ये एकुण १० महिला सदस्य आहेत. या बचत गटाच्या महिलांनी बँकेकडून कर्ज घेतले आणि घेतलेल्या कर्जाचा हप्ता दरमहा महिला बँकेत जमा केल्या जातो. त्यामुळे बचत गटाच्या अध्यक्षा या महिला सदस्या कडे हप्ता गोळा करत होत्या. त्यामध्ये गटातील थकबाकी असलेल्या एका सदस्य महिलेला हप्ता मागितला असता तिने सांगीतले की मी होत्याचे पैसे पती जवळ घरी ठेवले आहे तुम्ही घरी जावून पती कडून पैसे घेवुन जा असे सांगितल्याने अध्यक्षा ह्या पैसे आणण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या असता सदस्य पतीने पैसे देतो म्हणून वाईट उद्देशाने अध्यक्ष महिलेचा हात धरून घरात ओढले आणि छेडछाड (teasing) करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे घाबरून मोठ्याने आवाज केला असता लगेच सोडून दिले.
अशा महिला अध्यक्षांच्या तक्रारी वरुण अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कैलास उगले यांनी आरोपी किशोर चिंधाजी गवई यांच्या विरूध्द कलम ७४,७८, (१) (i),२९६ बी. एन. एस . प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे .