परभणी (Parbhani):- माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत २४ वर्षीय विवाहितेचा छळ (torture)केल्या प्रकरणी सासरच्या मंडळीवर पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवस चांगले नांदविल्यावर सासरच्या मंडळींनी दिला विवाहितेला त्रास
अनुष्का पतंगे या विवाहितेने तक्रार दिली आहे. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले नांदविल्यावर सासरच्या मंडळींनी विवाहितेला त्रास देण्यास सुरूवात केली. या दरम्यान विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी संसारोपयोगी साहित्य घेण्यासाठी एक लाख रुपये दिले. साहित्य न घेता सासरच्या मंडळींनी रक्कम खर्च केली. त्यानंतर पुन्हा दोन लाखाची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यास सुरूवात केली. मागील दीड वर्षापासून विवाहिता माहेरी आहे. या बाबत विवाहितेने भरोसा सेलकडे तक्रार अर्ज दिला. मात्र तडजोड झाली नाही. विवाहितेच्या तक्रारीवरून समाधान पतंगे, लक्ष्मीबाई पतंगे, रमेश पतंगे, सचिन पतंगे, गितांजली पतंगे, प्रिया यांच्यावर गुन्हा (crime)नोंद झाला आहे.
शिवीगाळची विचारणा केल्याने मारहाण
तु मला विनाकरण शिव्या का देतेस अशी विचारणा केल्यावर एका महिलेला चौघांनी मारहाण (beating)केली. ही घटना पूर्णा शहरातील पंचशिल नगर भागात घडली. रंजिता संगे्रल या महिलेने तक्रार(complaint) दिली आहे. सदर महिला देवदर्शनासाठी जात असताना शेजारी राहणार्या महिलेने त्यांना विनाकारण शिवीगाळ केली. याची विचारणा केल्यावर आरोपींनी संगनमत करत महिलेस अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी सिंधू एंगडे, विशाल एंगडे, छाया एंगडे, माया एंगडे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.