देवदरी येथील घटना, कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल
कळमनुरी/हिंगोली (Kalmanuri police) : कळमनुरी जवळील देवदरी शिवारात अवैधरित्या हातभट्टी दारू अड्डा सुरू असल्याची माहिती (Kalmanuri police) कळमनुरी पोलिसांना मिळताच पाऊस सुरू असतानाही पोलिसांनी चिखलात जाऊन (Hatbhatti liquor) हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त करून दोन आरोपी विरुद्ध कारवाई केली आहे.
कळमनुरी जवळील असलेल्या देवदरी शिवारातील एका नाल्याजवळ आरोग्याला हानिकारक असलेले वीषद्रव्य, नशाकारक, औषधी द्रव्य गावठी हातभट्टी दारूच्या सडव्यात व दारू मिसळून गावठी (Hatbhatti liquor) हातभट्टी दारू बेकायदेशीर रित्या बनवून चोरटी विक्री होत असल्याची गुप्त माहिती कळमनुरी पोलिसांना मिळताच भर पावसामध्ये (Kalmanuri police) पोलिस निरीक्षक मोहन भोसले,सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे, जमादार दिलीप पोले, नागोराव व्होडगीर, प्रशांत शिंदे, रामा शेळके यांनी देवदरी शिवारातील सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर भर पावसामध्ये धाड टाकली असता आरोपींनी तेथून पळ काढला.
मात्र पोलिसांनी १५ लिटर गावठी दारू २०० लिटरचे दोन बॅरल मध्ये ३० लिटर गूळ व मोहफूल,बिब्बे रसायन मिश्रित (Hatbhatti liquor) हातभट्टी दारू तयार करण्यासाठीचे सडके रसायन व एक मोटरसायकल असा एकूण ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान या प्रकरणी (Kalmanuri police) कळमनुरी पोलिस ठाण्यात जमादार दिलीप पोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विकास खिल्लारे व नूरखाँ पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे हे करीत आहेत.