रिसोड (Risod):- तालुक्यातील चिंचांबाभर येथिल शेतकरी कुटुंबातील दामोधर किसन इप्पर हे पोलिस विभाग 1993 ला पोलिस शापाई म्हणून रूजु झाले. त्यांच्या पोलिस विभागातील सेवे मध्ये अनेक गुन्हांचा यशस्वी तपासात त्यांची उल्लेख कामगीरीमुळे अनेक वेळा त्यांचा सत्कार झाला हे विशेष.
अनेक वेळा त्यांचा सत्कार
रिसोड पोलिस स्टेशन (Police Station)मध्ये मागील काही महीण्यापासुन पोलिस शिपाई पदावर आपले कर्तव्य पार पाडल्या नंतर मागील काही महिन्यापासून त्यांची ए. एस. आय. पदावर बढती मिळाली होती. ए. एस. आय. पदावर असतांना त्यांनी रिसोड पोलिस स्टेशन मध्ये सुध्दा आपल्या कार्याची छाप पाडली. तर पुर्वीच्या अकोला जिल्ह्य़ातील मुर्तीजापुर पोलिस स्टेशन ला त्यांची कारकीर्द गुन्हेगारीचा कर्दनकाळ ठरलेली होती. नुकतीच त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दामोधर इप्पर यांची पि. एस. आय. पदावर पदोन्नती देत त्यांच्या कार्याची दखल घेतली.
इप्पर हे स्वाभावाने अतिशय शिस्तप्रिय आसुन आपल्या कर्तव्याप्रती सतत प्रमाणिक राहातात.रिसोड पोलिस स्टेशन ला सुध्दांनी अनेकदा आपल्या कार्याची चुणुक दाखविल्याने जनसामान्यात त्यांची प्रति आदर निर्माण झालेला आहे.पोलिस विभागातील आपल्या 32 वर्षाच्या सेवा करीत येत्या 31 डिसेंबर ला ते सेवानिवृत्त होत आहेत.