मालेवाडा(Bhivapur):- दि.20/8/2024 सगळीकडे देशभरात स्वातंत्र्य दिनाचा(Independence Day) उत्साह सुरू असताना दुसरीकडे गरडापार या पारधी बेड्यावर मात्र सन्नाटा होता. कारण घरोघरी चार ते पाच रुग्ण हे तापाने अथवा अन्य विषाणूजन्य रोगाने फनफणत होते. 70 ते 80 घराचा हा बेडा आजारी पडला होता. आरोग्य विभाग(Department of Health) मात्र गावात यायला तयार नाही. अशा परिस्थितीत दैनिक देशोन्नतीच्या प्रतिनिधींना याची माहिती मिळताच प्रत्यक्ष या पारधी बेड्यावर जाऊन एक एक घरामध्ये पाहणी केली त्याची प्रत्यक्ष व्हिडिओ करून दैनिक देशोन्नतीच्या यूट्यूब चैनल ला बातमी टाकली तसेच देशोन्नती वर्तमानपत्रांमध्ये (Deshonnati Paper)ठळकपणे गरडापार अख्खा बेडा आजारी मात्र दवाखाना आपल्या दारी योजना आहे कुठे? असा सवालही उपस्थित केला.
दवाखाना आपल्या दारी या योजनेची गाडी गरडापारच्या पारधी बेड्यावर पोहोचली
अखेर आरोग्य विभागाने याची दखल घेतली व दवाखाना आपल्या दारी या योजनेची गाडी गरडापारच्या पारधी बेड्यावर पोहोचली. गावातील तब्बल65 रुग्णांची डॉक्टरांनी तपासणी केली औषध उपचार दिला. याप्रसंगी लहान बाळांचे लसीकरणही करण्यात आले. यामुळे गरडा पार येतील पारधी समाज बांधवांनी दैनिक देशोन्नतीचे आभार व्यक्त केले आहे. दरम्यान करुणा सुरज मारवाडी वय नऊ वर्षे या मुलीची गंभीर प्रकृती असल्याने काल तिला उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी नागपूर येथील मेडिकल मध्ये हलवण्याची सूचना केली त्यामुळे सध्या करुणा मेडिकलमध्ये उपचार घेत आहे.