पहिल्याच दिवशी ४०० रुग्णांची नोंदणी; १० जानेवारीपर्यंत चालणार शिबीर
हिंगोली (Health camp) : शहरातील नारायण नगर भागात असलेल्या अद्यावत व सर्व सोयीयुक्त लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटलच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबीरास १ जानेवारीपासुन सुरूवात करण्यात आली. या आरोग्य शिबीराच्या पहिल्याच दिवशी ४०० रुग्णांची नोंदणी झाली. टप्टप्याने रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. हे शिबीर १० जानेवारीपर्यत चालणार आहे. या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
या (Health camp) आरोग्य शिबीराचे उद्घाटन हनुमानदास अग्रवाल, मोहनलाल अग्रवाल, सुधाकरसा साकळे, डॉ. अखिल अग्रवाल,डॉ. प्राची अखिल अग्रवाल, डॉ.विजया मयुर अग्रवाल, डॉ.मयुर अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ. महेश मोरे, डॉ. पंजाब शेळके, डॉ. नितिन साकळे, डॉ. संजय अग्रवाल, डॉ. श्रीराम मोरे, माधव सपाटे,प्रा. संजीव अग्रवाल आदीची उपस्थित होते.
दरम्यान आयोजित शिबीरामध्ये १ जानेवारीला पहिल्याच दिवशी विविध रुग्णांच्या नोंदी घेवुन सोयीप्रमाणे तपासण्या व उपचार सुरू करण्यात आले. या शिबीरासाठी अॅपेडिक्स व हार्नियाच्या २७ रुग्णांच्या नोंदणी झालेली आहे. मुतखडा व प्रोस्टेटेच्या १४ रुग्णांची नोंदणी झालेली आहे. मुळव्याध व भंगदर ७ रुग्णांची नोंदणी झालेली आहे. रक्त तपासणीसाठी जवळपास २२५ रुग्ण नोंद तसेच अॅजोग्राफीसाठी ८० रुग्णांची नोंदणी झालेली असून पहिल्याच दिवशी १५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
अॅजोग्राफी व मुतखड्याच्या सर्व रुग्णांचे झालेल्या नोंदीच्या अनुक्रमानुसार तपासणी करून शस्त्रक्रिया सोयीनुसार केल्या जाणार आहेत. तसेच विविध रुग्णाच्या नोंदी १० जानेवारी पर्यंत घेतल्या जाणार असल्याचे (Health camp) लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटलचे डॉ. मयुर अग्रवाल, अभियंता अशोक अग्रवाल, डॉ. अखिल अग्रवाल यांनी सांगितले.