नागपूर (Health Card) : धर्म, संस्कृती, आणि आध्यात्मिक विचार यांचा प्रसार करणारे पत्रभेट मासिक रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या (Health Card) निमित्त या वर्षात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यात रविवार दि २३ जून रोजी १० ते ५ या वेळात पत्रभेट व नागपूर येथील स्वास्थ्यम हाॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने (Free Medical Checkup) मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर घेतले जाईल. तपासणी नंतर इच्छुक सभासदांना पत्रभेट आणि स्वास्थ्यम हॉस्पिटल तर्फे एक (Health Card) मिळणार आहे.
या कार्ड द्वारा स्वास्थ्यम (Swasthyam Hospital) येथे ठराविक उपचारांसाठी तसेच इस्पितळात भर्ती व्हावे लागले तर काही प्रमाणात सवलत मिळेल. पत्रभेट सभासदांसाठी हे आयोजन असून नवीन लोक शिबीर स्थळी उपस्थित होऊन सभासदत्व घेऊ शकतात. हेल्थ कार्ड बद्दल अधिक माहिती तिथेच दिली जाईल. या शिबीरात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. (Free Medical Checkup) मोफत वैद्यकीय तपासणी आणि (Health Card) हेल्थ कार्ड यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पत्रभेट संपादन व कार्यकारिणी विभाग द्वारा करण्यात आले आहे.