सिकलसेल सप्ताह निमित्त तालुका आरोग्य कार्यालयाकडून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी मोहीम
पुसद (Health checkup) : राज्य आरोग्य विभागाकडून विभागाकडून तालुका आरोग्य कार्यालयाकडून सिकलसेल तपासणी शिबिर ही राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज वार्ड नवल बाबा अवॉर्ड तसेच वसंतनगर देशमुख स्कूलच्या समोर जर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत आहे. या (Health checkup) शिबिराचा लाभ गोरगरिबांसह श्रीमंत पण घेत आहेत.
हे विशेष शिबिर तालुका आरोग्य अधिकारी Dr. नामदेवराव सरकुंडे, आरोग्य निरीक्षक किरण राठोड, आरोग्य सेविका कु.प्रीती गणवीर, आरोग्य सेवक मनीष जाधव, अशा सेविका सौ. वर्षा ठाकरे या चमूने छत्रपती शिवाजी महाराज वार्डातील व अधिक नवल बाबा वार्ड येथील नागरिकांची सिकलसेल या आजाराची तपासणी करण्यात आली आहे. या (Health checkup) विशेष शिबिराचा लाभ छत्रपती शिवाजी महाराज वार्ड व नवल बाबा वार्ड येथील असंख्य नागरिकांनी घेतला आहे.
राज्य आरोग्य विभागामार्फत आता तालुका गढी वार्ड नागरी आरोग्य केंद्र क्रमांक दोन च्या माध्यमातून सदर हे शिबिर राबविण्यात येत आहे हा सप्ताह सुरू असून या सप्ताहामध्ये असे अनेक ठिकाणी शहरांमध्ये असे यांच्या माध्यमातून कॅम्प सुरू आहेत. लाभ जास्तीत जास्त गोरगरीब सह श्रीमंतांनी व नागरिकांनी विशेष करून गोरगरीब महिलांनी घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव सरकुंडे यांनी केले आहे.