Gadchiroli:- चामोर्शी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायत मधील रामपुर या गावात मागील पाच दिवसांपासून डेंग्यू(Dengue)आजाराची साथ आहे.या गावात प्रत्येक दिवशी दोन -तीन नागरीक डेंग्यू आजारानी रुग्णालयात दाखल होत आहेत.आता पर्यंत १२ जण डेंग्यू आजारानी रुग्णालयात(Hospital) उपचार घेत आहेत. त्यातील ९ रुग्ण नावे..
१)वर्धाबाई डोंगरे
२) कमलाबाई डोंगरे,
३) लैजाबाई चांदेकर,
४)भाऊजी चांदेकर,
५)मोनू चांदेकर
६) जयंत चांदेकर,
७) ज्योती चांदेकर,
८) आरोही दुर्गे,
९) मारोती खोब्रागडे
नावे
१)उमेश डोंगरे ,
२) आनंदराव डोंगरे,
३) निर्मलाबाई डोंगरे
हे जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आय सी यु मध्ये उपचार घेत आहेत. डेंग्यूची साथ पसरली असतानाही मात्र आरोग्य विभागाचे (Health Department) अजूनही याकडे दुर्लक्षित होत असल्याने दिसून येत आहे तसेच नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे. तरी आरोग्य प्रशासनाने या परिस्थितीत कडे दुर्लक्ष केला जात आहे तरी या गंभीर रोगाकडे लक्ष केंद्रित करून गावातील प्रत्येक नागरीकांची डेंग्यू चाचणी घ्यावी अशी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा वाघाडे यांची मागणी आहे. तालुका आरोग्य अधिकारी हुलके यांच्याशी संपर्क साधला असून गावातील सर्व नागरिकांच्या रक्ताच्या चाचण्या (Blood tests) सुरू आहे आज फॉगिंग करण्यात येईल. आमची संपूर्ण टीम या गावातील नागरिकांची तपासणी सुरू आहे. त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.