रिसोड (Washim):- दिनांक १२ डिसेंबर रोजी रिसोड शहरातील लोणी फाटा येथे अवैध गर्भपात केंद्रावर (Illegal abortion centers) आरोग्य विभागने संयुक्त करवाई करत धाड टाकून कारवाई केल्याप्रकरणी रिसोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.
गर्भपातसाठी लागणारे अवजार व नगदी रोख रक्कम 1 लाख 40 हजार रुपये जप्त केली
अमोल भोपाळे वय 39 वर्षे असे आरोपीचे नाव असून सदर धाडीमध्ये गर्भपातसाठी(Abortion) लागणारे अवजार व नगदी रोख रक्कम 1 लाख 40 हजार रुपये जप्त केली आहे. याप्रकरणी रिसोड येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पवार यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा, अंतर्गत कार्यरत असलेले विधी समुपदेशक अँड. वंदना काकडे यांनी मला फोन व्दारे माहिती दिली की, रिसोड येथे आपल्याला अवैध गर्भपात प्रकरणी सापळा करून तपासणी करणे आहे.
त्याकरीता मी माझे सोबत डॉ. पुजा लाड, श्रीमती प्रिती बेलखेडे स्टाप नर्स, श्री सुधाकर निखाडे लॅब तंत्रज्ञ, श्री दिनेश वानखडे वाहन चालक, श्री. विजय देशमुख यांचे सह हजर होवुन पीसीपीएनडीटी सेल चे समुपदेशक अँड. वंदना काकडे, श्री मनोज जोशी सहायक, ज्ञानेश्वर मुळे, यांचे सोबत लोणी फाटा येथे जावुन शिव मुळव्याध व प्रसुती गृह येथे गेलो असता क्लिनीक मध्ये डॉ. अमोल अशोकराव भोपाळे हे हजर होते व क्लिनीक मधील रूमचे सर्व लाईट बंद होते, अधिकारी व सोबतचे डॉक्टर टिमने क्लिनीकची पाहणी करून क्लिनीक मधील प्रसुती कक्षामध्ये गर्भपात व प्रसुती करीता लागणारी आवश्यक असणारी सर्जीकल अवजारे आढळुन आली, व एकच महिला रुग्ण भरती असल्याचे मिळून आले महिला रुग्णाची चौकशी केली असता तिने सांगीतले की, तिला एक ६ वर्षे वयाचा मुलगा असुन सध्या ती साडेतिन महिन्याची गरोदर आहे.
तिला एक ६ वर्षे वयाचा मुलगा असुन सध्या ती साडेतिन महिन्याची गरोदर आहे
त्यांनतर तिने माझा गर्भ कमजोर असल्याचे मेहकर येथील सोनोग्राफी सेंटर येथे सांगीतले, सेंटरचे नांव व सोबत असलेल्या व्यक्तीचे नांव माहिती नाही. म्हणुन मी व माझे सासु सोबत रिसोड येथील डॉक्टर भोपाळे यांचेकडे गर्भपात करणे करीता आलो. त्यानंतर डॉ. भोपाळे यांनी मला भरती करून घेवुन गर्भपात करणे करीता गोळया (Tablets)दिल्या. असे नमुद रुग्ण हिने सांगीतले वरून डॉ. पुजा लाड यांनी रुग्णाची पुर्वसंमती घेवुन वैदयकीय तपासणी केली असता वैदयकीय तपासणी मध्ये रूग्ण हिला अशक्तपणा जानवत असल्याचे सांगीतले वरून तिला पुढील वैद्यकीय उपचारा करीता ग्रामीण रुग्णालय रिसोड येथे पाठविण्यात आले तेथे समुपदेशन व प्राथमीक उपचार करून रुग्ण व नातेवाईकांचे संमतीने पुढील उपचारा करीता रुग्णालयाचे १०२ चे रुग्णवाहिकीने जिल्हा स्त्री रूग्णालय (Women’s Hospital) येथे संदर्भात करण्यात आले.
रिसोड पोलिसांनी याप्रकरणी कलम 88 91 व 7 नुसार गुन्हा दाखल केला
सापळा कार्यवाही मध्ये डॉ. भोपाळे यांचे क्लिनीकचे वर राहत असलेल्या घराची तपासणी केली असता त्याचे कपाटामध्ये रुग्णाचे वेगवेगळे नांव असलेले लेबल लावुन ठेवलेली एकूण नगदी ५५०००/- रूपये व इतर नगदी ८५०००/- असे एकुण १४००००/- रूपये व इतर साहित्याचा स्वतंत्र जप्ती पंचनामा तयार करण्यात आला आहे. डॉ. अमोल अशोक भोपाळे वय 39 वर्ष.रा. लोणी फाटा रिसोड ता. रिसोड जि. वाशिम. यांचेकडे कोणत्याही प्रकारचा गर्भपात करण्याचा परवाणा नसतांना अवैध रित्या रुग्ण महिलेचा गर्भपात करतांना मिळुन आले. रिसोड पोलिसांनी याप्रकरणी कलम 88 91 व 7 नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोंगरे करत आहेत.