हिंगोली(hingoli) :- ब्लिचिंग पावडरची (Bleaching powder) गुणवत्ता तपासून, गावपातळी वर किती प्रमाण घेऊन त्याचे द्रावन करून पाण्यात मिळाले पाहिजे आणि पाण्याच्या तपासण्या केल्या का नाही याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची काळाची गरज असल्याचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी सोमवारी गुणवत्ता कार्यशाळेत सांगितले.
जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेचे उदघाट्न
हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या शटकोनी सभागृहात सोमवारी 13 जानेवारीला पाणी व पुरवठा स्वच्छता विभाग(Sanitation Department) , जळजीवन मिशन हिंगोली अंतर्गत जिल्हास्तरीय पाणी व स्वच्छता आणि गुणवत्ता विषयक कार्यशाळेचे उदघाट्न झाले. यावेळी केंद्रे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, केशव गड्डापोड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल सोळंखे, प्रशांत दिग्रसकर, भुजल वैज्ञानिक रवींद्र मांजरमकर, राजू एडके, डॉ. कैलास शेळके, अभियंता उमाळे, महेश थोरकर, यांच्यासह गटविकास अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तिन्ही विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सांगून फ्लोराईड, नायट्रेट, क्लोरीन मुळे हाडे ठिसूळ होतात
नामदेव केंद्रे पुढे म्हणाले, पाण्याचा पीएच तपासला पाहिजे असे सांगून टीडीएस हा सातसे पेक्षा अधिक राहिल्यास पाण्याची गुणवंत्ता बिघडते, असे सांगून फ्लोराईड, नायट्रेट, क्लोरीन मुळे हाडे ठिसूळ होतात, जास्त आयरन असलेले पाणी देखील शरीरासाठी घातक ठरते असे स्पष्ट केले. पाण्याचे स्रोत तपासले पाहिजे, सर्वांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यासाठी सर्व यंत्रनेने वेळोवेळी पाहणी केली पाहिजे अशा सूचना पाणी व स्वच्छता विभागाला दिल्या. दरम्यान, आता जिल्हा पातळीवर कार्यशाळा असून यापुढे तालुका स्तरावर घेण्यात येईल. असे सांगून पावसाळ्या पूर्वी आणि नंतर दोनदा पाणी तपासणी केली जाते, या कार्यशालेत पाणीपुरवठा गुणवंत्ता आणि सर्व्हेक्शन या दोन मुद्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. तर अतुल साळुंखे यांनी पाण्याच्या तपासण्या वेळोवेळी करण्याचे सांगून त्यातील जैवीक आणि रासायनिक तपासण्या झाल्या पाहिजे. रासायनिक घटका मुळे पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यासह तांत्रिक पद्धतीने माहिती दिली. त्यानंतर लॅब तांत्रिक विभागाने पाणी टेस्ट कसे केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.