हिंगोली (hingoli):- हिंगोली येथे दि. 6 जुलै, 2024 रोजी मराठा आरक्षणाशी संबंधित जनसंवाद रँली आयोजित करण्यात आली असून, या रॅलीसाठी येणारा जनसमुदाय व अधिकारी, कर्मचारी यांना औषधी साठा (medicinal stock)आणि रुग्णवाहिका(Ambulance) आदी आरोग्य सुविधा(Health facilities) पुरविण्यासाठी सकाळी 6 ते रॅली कार्यक्रम संपेपर्यंत 16 आरोग्य पथकामार्फत आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी आज काढले आहेत.
’16 आरोग्य’ पथके
पथक क्र. 1 चे पथकप्रमुख डॉ. नामदेव पवार (9518744878) व 2चे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल दरगु (8087674950) हे मनोज जरांगे यांच्या जनसंवाद रॅलीसोबत राहणार आहेत. पथक क्र. 3 चे प्रमुख डॉ. कैलास पवार (9850960711) यांच्यासह पथक सिटी क्लब मैदान परिसर येथे उपस्थित राहणार आहे. पथक क्र. 4चे प्रमुख डॉ. शिवाजी विसलकर (7385062223) पोलीस पेट्रोलपंप परिसर, पथक क्र. 5चे प्रमुख डॉ. किशन सोनकांबळे (8308003866) हे आखरे मेडिकल परिसर, पथक क्र. 6चे प्रमुख डॉ. नितीन बोरकर (8421488337) हे रामलीला मैदान येथे उपस्थित राहणार आहेत. तर पथक क्र. 7चे प्रमुख डॉ. शाम बोकारे (7709462797)हे पोस्ट ऑफिस रोड जवळ, पथक क्र. 8चे प्रमुख डॉ. मधुकर भोसले (9766720324) हे खुराणा पेट्रोल पंपाजवळ, पथक क्र. 9चे प्रमुख डॉ. अमोल भालेराव (8850721362) हे महात्मा गांधी चौक परिसर येथे उपस्थित राहणार आहेत.
पथक क्र. 10चे डॉ. शिवाजी माने (9970798578) हे देशमुख हॉस्पिटल शिवाजीनगर जवळ, पथक क्र. 11चे प्रमुख डॉ. शिवाजी पतंगे (8850721362) हे सह्याद्री हॉस्पिटल एनटीसी, पथक क्र. 12 चे प्रमुख डॉ. शिवाजी टोपे (9657144379) हे नवजीवन हॉस्पिटल परिसर एनटीसी, पथक क्र. 13चे प्रमुख डॉ. प्रशांत घुगे हे (9028457777) हे सिटी क्लब मैदान परिसर, पथक क्र. 14चे प्रमुख डॉ. जगदीश गोरे (7588153892)हे पोलीस पेट्रोल पंप परिसर, पथक क्र. 15 चे प्रमुख डॉ. कैलास गायकवाड (9922551017) व 16 चे प्रमुख डॉ. मनोज साबु (9423737531 )हे रामलीला मैदान येथे उपस्थित राहणार आहेत.
वरील सर्व पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संबंधित जनसमुदायास आरोग्य सुविधा पुरविण्याचे आदेश दिले आहेत.