हिंगोली(Hingoli):- “स्वच्छता ही सेवा” अंतर्गत नगर पालिकेमार्फत अग्निशमन कार्यालय (Fire Department) परिसरात 27 सप्टेंबर रोजी “सफाई मित्र सुरक्षा आरोग्य तपासणी शिबीर” उपक्रम राबविण्यात आला. ज्यामध्ये 160 सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
160 सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (moHUA) , भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान “स्वछता ही सेवा”(SHS) पंधरवड्याचे आयोजन करून “स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता” हि संकल्पना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. याअनुषंगाने नगरपालिके मार्फत शहरात विविध उपक्रम, लोकसहभाग, जनजागृती करणे बाबत आदेशित केले आहे. त्याअंतर्गत हिंगोली नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिके मार्फत स्वच्छता हि सेवा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये श्रमदान, स्वच्छता शपथ, एक पेड मा के नाम, विविध स्पर्धा, जनजागृती पर कार्यक्रम, सेल्फी पॉइंट, पथनाट्ये, स्वच्छता पाठशाला, ई. कार्यक्रम आयोजित केले आहेत. नगर परिषदेच्या वतीने आज 27 सप्टेंबरला अग्निशमन कार्यालय परिसरात स्वच्छता हि सेवा SHS अभियाना अतंर्गत सफाई मित्र यांच्या करीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सफाई मित्र यांच्या करीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
यावेळी आरोग्य शिबिरात (health camp) नगरपरिषद मधील जवळपास 160 सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.तसेच त्यांना स्वताचे आरोग्य कसे सुदृढ व स्वस्थ ठेवता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी श्याम माळवटकर , स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, अभियंता प्रतीक नाईक, अभियंता किशोर काकडे, प्रवीण मोहेकर,अभियंता सनोबर तसनीम, उत्तम जाधव,आशिष रणशिंगे, भागवत धायतडक, दिनेश वर्मा, विजय शिखरे, कमलेश इंगळे, अथर्व वर्मा, आकाश गायकवाड, रवी जोंधळे, रवी गायकवाद, चेतन भूजवाने, डॉ.चव्हाण, डॉ.पुंडगे, डॉ.शेख, शुभम पाटील, देशमुख यांच्या आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात नगर पालिका अधिकारी,स्वच्छता कर्मचारी उपस्थीत होते.