शासकीय योजनांचा सफाई कर्मचाऱ्यांना लाभ द्यावा
सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत
कर्मचा-यांना आभा कार्ड व प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे वितरीत
हिंगोली (Cleaning staff) : सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात यावी. त्यासाठी जिल्ह्यात शिबिरे घेवून सर्व (Cleaning staff) सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करावी, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय (Cleaning staff) सफाई कर्मचारी आयोगाची बैठक डॉ. वावा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस जिल्हाधिकारी अभिनव गोयल, सदस्यांचे सल्लागार गिरजेंद्र, सहायक आयुक्त नगर पालिका प्रशासन विभाग अनंत जवादवार, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. वावा यांच्या हस्ते (Cleaning staff) सफाई कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पीएम जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजनेबाबतची माहिती देण्यात आली. तसेच सफाई कामगारांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, आयुष्मान भारत योजनेंतर्गंत आभा कार्डचे वितरण डॉ. वावा यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. वावा म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची (Cleaning staff) सफाई कर्मचाऱ्यांना मदत मिळण्यासाठी शासन निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी. सफाई कामगारांना कठीण समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. तसेच हक्कापासून सफाई कामगार वंचित राहणार नाही. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे निर्देशही डॉ. वावा यांनी दिले. सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर केवळ अर्थसहाय्य न देता त्यासोबत त्यांच्या पाल्यांना माध्यमिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, वृध्द आई-वडिलांना पेंशन तसेच त्यांना घर नसल्यास घरबांधणीसाठी अर्थसहाय्य करणे गरजेचे असल्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी केली.
प्रारंभी डॉ. वावा यांनी जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगरपंचायतीचा आढावा घेतला. लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नियुक्ती प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. सफाई कर्मचारी कार्यरत असलेल्या सर्व आस्थापनांचा व त्यातील प्रलंबित असलेल्या प्रकरणांचाही त्यांनी आढावा घेतला.
सफाई कर्मचाऱ्यांना (Cleaning staff) प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी तसेच अस्थायी व स्थायी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश, गमबुट, हँडग्लोज, रेनकोट, थंडीचे स्वेटर आदी साहित्य वेळोवेळी पुरवठा करण्यात यावा. त्यांच्या ओळखपत्रावर मोबाईल क्रमांक, रक्तगट, ईपीएफ, ईएसआयसी नंबरही अनिवार्य करण्यात यावा. आणि सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करण्यात यावे. त्यांचे वेतन वेळेवर होत असल्याची डॉ. वावा यांनी खात्री केली. यावेळी सफाई कर्मचारी व त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.